पेशवेकालिन रहाडीत घेता येणार रंगोत्सवाचा आंनद

0

नाशिक : नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची प्रथा आहे. नाशकात पेशवेकालीन रहाडीत रंग खेळला जातो. मात्र गेल्यावर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने या रहाडी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र यदा समाधानकारक पाउस झाल्याने रंगोत्सवासाठी रहाडी खुल्या केल्या जाणार आहेत.

पेशवाईत नाशकात सात रहाडी (दगडी बांधकाम केलेले हौद) बनविण्यात आल्या होत्या. यात सरदार चौक, दिल्ली दरवाजा, मधली होळी, तांबट लेन, तिवंधा चौक, शनिचौकात या रहाडी आहेत. त्यातील सरदार चौक, तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा या 3 रहाडी आजही वापरल्या जातात. एरवी वर्षभर बुजवलेली रहाड रंगपंचमीच्या आदल्या दिवशी खोदून स्वच्छ केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी पाणी तापवून त्यात विविध नैसर्गिकरंग मिसळले जातात व ते रहाडीत टाकले जातात. रहाडीचे विधिवत पूजन करून रंगोत्सवाला सुरुवात होते.

रहाडीची पुजा करण्याच आणि सर्वप्रथम रहाडीत उतरण्याचा मान परिसरातील एका कुटुंबाला दिला जातो. रंगपंचमीच्या चार दिवस अगोदर रहाडी खोदण्यास सुरूवात करण्यात येते. रहाडींची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या रहाडींमध्ये डुबकी घेतली की शारीरिक व्याधी दूर होतात, असे समजूत असल्याने अनेकांची पाऊले खासकरुन रहाडींकडे वळतात. सार्वजनिक मंडळांकडून या रहाडींवर रंगपंचमीचे आयोजन केले जाते.

मागील वर्षी जिल्हयाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागल्याने सार्वजनिक मंडळांनी रहाडी न उघडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा समाधानकारक पाउस झाल्याने तिवंधा चौक वगळता इतर रहाडींमध्ये नाशिककरांना रंगोत्सवाचा आंनद घेता येणार आहे. माजी नगरसेवक प्रकाश सदावर्ते आणि मुंकुंद भालेराव यांचे निधन झाल्याने तिवंधा चौकातील रहाड बंद ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

LEAVE A REPLY

*