पेरणीसाठी हातात पैसे नसल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0
चहार्डी ता.चोपडा (वार्ताहर)-सततची नापिकी,कर्ज व खरीप पेरणी साठी हातात पैसे नसल्याने हातेड बु!! येथील राहुल रमेश पाटील वय ३५ या तरुण शेतकऱ्याने आज गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
याबाबत अधिक माहिती अशी की दि.१३ रोजी पहाटे सहा वाजेपुर्वी राहुल रमेश पाटील वय ३५ याने गावाबाहेर उभा असलेल्या पाण्याच्या टँकरला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यास चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.नरेंद्र पाटील यांनी त्यास मृत घोषित केले.याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात डॉ.नरेंद्र पाटील यांचे खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहेत .

राहुल पाटील यांना तीन बिघे शेती आहे त्यांचेवर ५० हजारांपर्यंत सोयासायटीचे कर्ज आहे.कर्जमाफी झाली तरी नवीन कर्ज अजून मिळत नाही. पाऊस पडला तरी खरीप पेरणी करण्यासाठी पैसे कसे उपलब्ध करू ? या विवंचनेत त्याने आत्महत्या केली.असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यांच्या मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत राहुल पाटील यांचे पश्चात आई , पत्नी व नऊ वर्षाची लहान मुलगी असा परिवार आहे.वडीला नंतर आई ,बहीण व राहुल हे तिन्ही वारस होते.त्यांची मिळून शेती राहुलच करीत होता.

LEAVE A REPLY

*