‘पेड कार्यकर्ते जमविण्याची गरज सेनेला नाही’; अनिल राठोड पुन्हा गरजले

0

नामोल्लेख टाळत जगतापांवर साधला निशाना

अहमदनगर (प्रतिनिधी)– शिवसेना जातीयवादी पक्ष नसून इतर पक्ष स्वतःची पोळी भाजण्यासाठी याला जातीयवादाचे स्वरूप देण्याचे प्रयत्न करीत आहेत. सेनेने कधीही सच्चा कार्यकर्त्यावर अन्याय केलेला नाही. पैसे देऊन कार्यकर्ते आणण्याची गरज सेनेला कधीही पडत नाही. बळजबरीने पक्ष प्रवेश करून घेणार्‍यापैंकी आम्ही नाहीत, असे स्पष्ट करत सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी नामोल्लेख टाळत आमदार जगताप पिता-पुत्रांवर निशाना साधला.
हातमपुरा तरुण मंडळ, अलफता सोशल क्लब व शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेसंदर्भात प्रबोधनपर व ईदमिलन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक नज्जू पहेलवान, दत्ता कावरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहरप्रमुख रियाज सय्यद, नगरसेवक सचिन जाधव, संभाजी कदम, गणेश कवडे, आशा निंबाळकर, इसहाकबापू, इक्बाल सय्यद, अंबादास पंगुडवाले, राजेंद्र मोरे, कैलास पठारे, सय्यद याकूब, लंकेश हरबा, विलास गावडे, प्रेम परदेशी, राम पठारे, सुनील लोखंडे, शेख शाहीद, शेख सुबान, शरद गावडे, विष्णूपंत डहाळे, यासीन उमरसाहब, सादिक मेंबर, असगर मामू, करीमसाहब, विठ्ठल परदेशी, मधुकर कंठाळे, सय्यद इजहान, शेख हमजा, नवाज खान, शेख हसीन, ताबीज शेख उपस्थित होते.
स्वखुशीने अनेकजण आज शिवसेनेत येत आहेत. नगरकर कायम शिवसेनेच्या पाठीशी राहिले असून, विकासकामांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आश्‍वासन अनिल राठोड यांनी दिले. शिवसेनेत सर्वांना समान संधी दिली जाते. सेनेत घराणेशाही चालत नाही. त्यामुळेच सामान्यातील सामान्य कार्यकर्ता शिवसेनेत मोठा होतो. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडत असेल, तेथे शिवसेना धाव घेते. आम्ही हे काम करताना कधीही जातपात न पाहता सर्वांना सारखा न्याय देतो. रियाज सय्यद हा सच्चा कार्यकर्ता असून, त्यांना पक्षाने अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली आहे.अनिल राठोड यांनी दिले. शिवसेनेत सर्वांना समान संधी दिली जाते. सेनेत घराणेशाही चालत नाही. त्यामुळेच सामान्यातील सामान्य कार्यकर्ता शिवसेनेत मोठा होतो. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडत असेल, तेथे शिवसेना धाव घेते. आम्ही हे काम करताना कधीही जातपात न पाहता सर्वांना सारखा न्याय देतो. रियाज सय्यद हा सच्चा कार्यकर्ता असून, त्यांना पक्षाने अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली आहे.महापौर कदम म्हणाल्या की, नगर जिल्ह्यात सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत असून, या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येकानेच पुढे येण्याची गरज आहे. समाजामध्ये जागृतीची गरज आहे. शिवसेना घराणेशाही विरोधात असून, नेहमीच सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. नगर शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. रियाज सय्यद म्हणाले की, समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम रहावे, यासाठी आम्ही नेहमीच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून ऐक्य टिकविण्याचे काम करतो. हातमपुरा तरुण मंडळ, अलफता सोशल क्लब व शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवित आहोत.  राम पठारेे, सुनील लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी केले, डॉ. हनीफ अब्बास यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*