पेट्रोल, डिझेल मध्यरात्रीपासून स्वस्त

0

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणि रुपयाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य या दोन घटकांमुळे पेट्रोलच्या किंमतीत सोमवारी मध्यरात्रीपासून २ रु. १६ पैशांनी, तर डिझेलच्या किंमतीत २ रु. १० पैशांनी घट झाली आहे.

गेल्या चार आठवड्यांत पेट्रोलच्या किंमतीत झालेली ही पहिली घट आहे.

२६ मे रोजी केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
मोदी सरकारला या महिन्यात तीन वर्ष पूर्ण होत असताना पेट्रोल-डिझेल दरात मोठी कपात करण्यात आल्याने ही केंद्र सरकारकडून सर्वसामान्य जनतेला भेट दिल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*