पेट्रोलपंप चालकांकडून होणारी लूट थांबवावी

0

श्रीरामपुरातील युवकांची निवेदनाद्वारे मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर व तालुक्यामध्ये पेट्रोलपंप चालकांकडून सर्वसामान्य वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहर व तालुक्यामध्ये पेट्रोल पंप चालकांकडून सर्वसामान्य वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट चालू असून शहर व तालुक्यातील पेट्रोल पंप चालक हे त्यांच्याकडे असलेल्या पेट्रोल टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून दर्जाहीन पेट्रोल वाहनचालकांना देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सदर प्रकार सर्रासपणे चालू आहे.

सरकारी अधिकार्‍यांनी सर्व पेट्रोल पंपाची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे होते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी अधिकार्‍यांनी शहर व तालुक्यातील पेट्रोलपंप चालक हे कोणत्या प्रकराचे, कसे पेट्रोल देतात याची कोणतीही माहिती घेतलेली नाही.

भेसळयुक्त पेट्रोल वाहनांमध्ये टाकल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते तसेच पेट्रोल पंप चालक आपल्या पंप युनिटमध्ये विशिष्ट प्रकारची चीप बसवितात, त्यामुळे पंप युनिटवर असलेल्या डिस्प्लेवर असलेले आकडे व्यवस्थित दिसतात, परंतु या चीपमुळे पेट्रोल-डिझेल ग्राहकांना एका लिटरमागे साधारण 0.50 म्हणजे तीन रुपयांचे कमी पेट्रोल दिले जात असल्याबाबत दाट संशय आहे

अशा प्रकारे सर्व वाहनधारकांची लूट करण्यात येत असून शहर व तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करून सर्वसामान्य वाहनचालकांची होणारी लूट त्वरित थांबवावी अन्यथा महात्मा गांधी पुतळा येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर तिलक डुंगरवाल, अमोल सावंत, अनंत पाटील, विकास डेंगळे, दीपक बर्डे, राहुल रनपिसे, संतोष रुपटक्के, सतीश पोपळघट, रोहित परदेशी, अक्षय निर्मळ, ऋषिकेश सोनवणे, रोहित भोसले, दीपक परदेशी, गणेश माळवे, किरण देवांगण, गौरव शेटे आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*