पेट्रोलपंपाला रविवारी सुट्टी ; सकाळी 9 ते 6 वेळेतच भरा पेट्रोल

0

14 मेपासून अंमलबजावणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – सरकारमान्य तेल कंपन्यांनी अपूर्व चंद्रा समिती (2011) चा अहवालची अंमलबजावणी न केल्याने, तसेच 4 नोव्हेंबर 2016 चा करार न पाळल्याने राज्यातील पेट्रोलपंप चालक फेडरेशनने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला त्यांनी खर्चात बचत करणारे कामकाज असे नाव दिले आहे. यात दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्यासह 15 मे पासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत पेट्रोलपंप चालक फेडरेशन (फामपेडा) यांच्यावतीने प्रसिध्द पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात सरकारमान्य तेल कंपन्यांच्या मनमानी कारभारवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने 22 जून 2010 ला अपूर्व चंद्रा यांची समिती गठीत केली. या समितीचा अहवाल 14 जानेवारी 2011 ला सरकारला सादर करण्यात आला. 19 जानेवारीला सरकारने हा अहवाल स्वीकारला. त्यानंतर 10 सप्टेंबर 2012 ला सीआयपीडी कडून अहवाल अंमलात न आणल्याबद्दल पेट्रोलपंप चालकांनी 1 व 2 ऑक्टोबरला नो परचेसची भुमिका घेतली.

16 ऑक्टोबर 2012 ला चंद्रा समितीला डावलून तेल कंपन्यांनी अत्यल्प प्रमाणात मार्जीन (नफा) वाढवले. त्यानंतर 16 सप्टेंबर 2013 पेट्रोलियम मंत्रालयाने तेल कंपन्यांना चंद्रा समितीचा अहवाल पूर्णपणे अंमलात आणण्याचे आदेश दिले. 22 डिसेंबर 2013 ला राज्यनिहाय पेट्रोल-डिझेल डिलर मार्जीनलसा सुरूवात झाली आणि चंद्रा समितीचे निकष पुन्हा दुर्लक्षीत करण्यात आले. 22 ऑक्टोबर 2014 ला पेट्रोलियम मंत्रालयाकडून पुन्हा तेल कंपन्यांना चंद्रा समितीचे निषक अंमलात आणण्याचे आदेश दिले.

मात्र, 4 मार्च 2015 पेट्रोलियम राज्यमंत्री यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देतांना पेट्रोल, डिझेलचे मार्जीर्न ठरवण्याचे अधिकार तेल कंपन्यांना असल्याचे स्प केले होते. याच उत्तराचे 28 नोव्हेंबर 2016 ला लोकसभेत्तचे पुनर्रावृत्ती झाली. 3 ऑक्टोबर 2016 ला विजयवाडा येथील सीआयपीडी च्या बैठकीत प्रलंबित मागण्या व चंद्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी न झाल्याने 5 नोव्हेंबरपासून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यात प्रत्येक महिन्यांचा दुसरा आणि चौथा शनिवार व रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
9 मार्च 2017 ला दिल्ली येथे झालेल्या बैठकीत तेल कंपन्यांनी पुन्हा दोन महिन्यांची मुदतीची मागणी केली होती. 9 एप्रिल 2017 या दोन महिन्यांची मुदत संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर कुरूक्षेत्र येथे झालेल्या बैठकीत रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्यासह 15 मे पासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत पंप सुरू ठेवण्याचा 10 मे ला पेट्राल आणि डिझेलीची तेल कंपन्यांकडून खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ङ्गामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*