Type to search

क्रीडा जळगाव

पॅसीफीक स्पोर्टस्च्या शिबीराचा समारोप

Share

जळगाव ।वि.प्र.- येथील पॅसीफीक स्पोर्टस् अ‍ॅन्ड कल्चरल असोसिएशन तर्फे आयोजित उन्हाळी क्रीडा शिबीर 20 एप्रील ते 20 मे पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या शिबीराचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला.

या उन्हाळी शिबीरात 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या शिबीरात कराटे, डान्स, स्केटींग, स्वीमिंग, योगा, क्रिकेट, रोप क्लायबिग, मंकी क्रावंलिग, हॉर्स रायडिंग, रायफल शुटींग, आदि प्रकारचे खेळांच्या प्रशिक्षणासह शारीरीक व्यायाम, व वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यात आली.

शिबीराच्या समारोपप्रंसगी विद्या इंग्लिश स्कुलच्या उपाध्यक्षा सौ. माधवी थत्ते, ड्रॅगन्स फिटनेस क्लबचे संचालक बि.आनंदकुमार, दिलीप बोरसे, व संदिप पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखविले.तसेच विविध प्रकारचे नृत्य शिबीरार्थी विद्यार्थ्यांनी सादर केल्याने उपस्थित पालकांनी कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय चव्हाण, सुनिल चव्हाण, सौ. विनीता पाटील, मुजफ्फर शेख, संदीप गव्हाळे, कु. वैशाली चव्हाण, तेजस माळी, उत्कर्षा चौधरी, गौरव चौधरी, चेतन सपकाळे, जोगींदर मौर्या, पुनम मॅडम, धनंजय भालेराव, आदिनी परीश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!