Type to search

जळगाव

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सांगली जिल्ह्यात मोफत आरोग्य सेवा

Share

जळगाव । जल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील व त्यांच्या सहकार्‍यांसह तीन ते चार डॉक्टरांचे पथकातर्फे मोफत अत्यावश्यक औषधीसाठा व जिवनावश्यक साहित्य घेऊन सांगली येथे पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून आरोग्यसेवा उपलब्ध करून देत असल्याचे म्हटले आहे.

गेल्या आठवडयात कोल्हापूर सांगली परीसरात अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचेशी चर्चा करून ज्या ज्या भागात जास्त नुकसान झालेले आहे त्याठिकाणी ही मदत पोचवली जाईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून रवींद्र पाटील यांनी आधीच आपल्या जि.प.सदस्यत्वाचे एक वर्षाचे मानधन पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून जाहीर केलेले आहे. सोमवार 12 ऑगस्ट रोजी इस्लामपूर भागातील साटपेवाडी, गौंडवाडी,बनेवाडी, मसुचि वाडी, फार्णे वाडी आदी गावांमध्ये मोफत आरोग्य सेवा व औषधी साठा पुरवठा करण्यात आला. राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांचे समवेत भडगाव येथील डॉ. हेमंत पाटील, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, दिनेश पाटिल आदि पदाधिकारी कार्यरत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!