Type to search

ब्लॉग

पुरुष प्रजनन संस्था

Share

वयात येणार्‍या मुलांना काहीतरी वेगळे वाटत असते. कोणाशी बोलावे तेही कळत नसते. संकोच आणि सगळाच गोंधळ असतो. या अडनिड्या वयात काय गंमत असते, ते आपण समजून घेणार आहोत या लेखमालेत..

आपल्या शरीरातील प्रजनन संस्था समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण पुरुषांच्या जननेंद्रियांची रचना, कार्य याची माहिती घेऊयात. पुरुषांचे शिस्न (शिपळी) व वृषण (ढशीींळी) हे अवयव शरीराच्या बाहेर दिसतात. शुक्राणू कोश, पूरःस्थ ग्रंथी व काऊपर ग्रंथी ओटीपोटात असल्याने आपल्याला दिसत नाहीत.

बाहेरून दिसणारे अवयव : * शिस्न : मुलांमधे प्रामुख्याने टेस्टेस्टेरॉन हा अंतःस्त्राव निर्माण होतो. मुलांचे बाह्य जननेंद्रिय सहज दिसणारे असते, त्याला शिस्न असे म्हणतात. हे नळी सारखे लांबट असते. शिस्नाला बाहेरून त्वचेचे आवरण असते. शिस्नाच्या आत एकमेकांशी जुळलेल्या तीन नळ्या असतात. प्रत्येक नळीत स्पंजाप्रमाणे असंख्य कोश असतात. शिस्नातील मूत्रनलिकेतून लघवी येते. उत्तेजित झाल्यानंतर याच मार्गातून धातू व शुक्रबीज बाहेर टाकले जातात. शिस्न हे पूर्णपणे सरळ नसते तर उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेले असते. साधारणपणे उत्तेजित शिस्नाची लांबी 4 ते 6 इंच असते. कोणत्याही प्रकारच्या औषधाने, व्यायामाने किंवा मालीश केल्याने शिस्नाचा आकार वाढू शकत नाही. शिस्नाच्या आकाराचा आणि लैंगिक सुखाचा काहीही संबंध नसतो. शिस्नाला बाहेरुन जे त्वचेचे पातळ आवरण असते, शिस्न जेव्हा ताठरत तेव्हा ही त्वचा मागे सरकते आणि शिस्नाचे टोक पुढे येते. शिस्नाचे ही पातळ त्वचा खालच्या बाजूने वृषणास जोडलेली असते. त्यामुळे ती जोरात मागे ओढू नये. काही जमातींमध्ये ही पुढची त्वचा लहानपणीच कापून टाकतात. ही पद्धत प्रत्येकाच्या मानण्यावर अवलंबून असते. * वृषण : शिस्नाच्या खालील बाजूस दोन वृषण असतात. या दोन्ही वृषणांचा आकार सारखाच असला पाहिजे असे नाही. वृषणामधे असंख्य नलिका असतात. या नलिकांच्या पोकळीत रोज कोट्यवधी शुक्राणू तयार होतात. तयार झालेले शुक्राणू अधिवृषणात येतात. येथे शुक्राणूंची वाढ पूर्ण होते. शुक्राणू पुढे शुक्रवाहिनीत जातात. शुक्रवाहिनीच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या फुगीर भागात म्हणजेच तुंबिकेत येऊन विसावतात. ओटिपोटात असणारे अवयव : * शुक्रवाहिनी (तरी वशषशीशपी) : अधिवृषणात साठलेले शुक्राणू वाहून नेण्याचे काम शुक्रवाहिनचे असते. *शुक्राणू कोश (डशाळपरश्र तशीळलश्रशी) : शुक्रवाहिनाला लागूनच दोन लहान पिशव्या असतात. या पिशवीला शुक्राणू कोश असे म्हणतात. येथे एक रंगहीन स्राव तयार होतो. या स्रावामुळे शुक्राणूंचे पोषण होते. * पुरःस्थ ग्रंथी (झीेीींरींश सश्ररपव) : ही ग्रंथी सुपारी एव्हढी असते. ती मूत्राशयाला चिकटलेली असते. या ग्रंथीतून मूत्रमार्ग आरपार जातो. पूरःस्थ ग्रंथीमध्ये दुधी रंगाचा स्राव बनतो. या स्रावामुळे शुक्राणू सचेतन होतात. * काउपर ग्रंथी (उेुशिी सश्ररपव): शिस्नाच्या मुळाजवळ काउपर ग्लँण्ड नावाच्या काबुली चण्याइतक्या मोठ्या दोन ग्रंथी असतात. या ग्रंथी मूत्रमार्गाला जोडलेल्या असतात. या ग्रंथीतील स्त्रावामुळे वीर्य येण्यापूर्वी मूत्रमार्गातील आम्लता धुतली जाते.

जननेंद्रियांची स्वच्छता : * जननेंद्रिय रोज पाण्याने स्वच्छ धुवावेत, यासाठी साबण किंवा जंतुनाशके यांची गरज नसते. * शिस्नावरील त्वचेखालील चिकट भागात घाण साचून राहण्याची शक्यता असते, त्यासाठी ही त्वचा हळूवारपणे मागे ओढून शिस्नाचे टोक स्वच्छ धुवावे. * दररोज अंतर्वस्त्र संपूर्ण साबण निघून जाईपर्यंत धुवावीत आणि सूर्यप्रकाशात वळवावीत. संसर्ग टाळण्यासाठी सूर्यप्रकाश हा सर्वोत्तम मार्ग आहे. * या व्यतिरिक्त काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर वेळीच घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलावे किंवा तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. आपले शरीर ही आपली संपत्ती आहे, त्याची काळजी घेणे जरुरी आहे व आपली जबाबदारीही आहे .
meghamanohar1971@gmail.com
मेघा मनोहर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!