पुरवठा अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरुन तरवडीच्या रॉकेल विक्रत्यावर गुन्हा दाखल

0

नेवासा (का. प्रतिनिधी)- तरवडी-कुकाणा रोडवर कांद्याच्या गोण्यांमधून विनापरवाना बेकायदा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जाणारे रॉकेल जप्त केल्यानंतर अखेर या प्रकरणी काल नेवासा येथील पुरवठा अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरुन तरवडीच्या रॉकेल विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 
याबाबत तरवडीचे पोलीस पाटील विकास भागवत यांनी पोलीस व पुरवठा विभागाला माहिती देवून 25 एप्रिल रोजी हे रॉकेल पकडून दिले होते. पोलिसांनी वाहन व रॉकेलची टाकी जप्त केली होती. मात्र पुरवठा विभागाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती. अखेर काल शुक्रवारी पुरवठा अधिकारी बुद्धानंद नामदेव धंडोरे (वय 34) धंदा-नोकरी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन रेशन व रॉकेल दुकानदार अभिजीत किसन महाशिकारे रा. तरवडी ता. नेवासा याच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 
फिर्यादीत म्हटले की, 25 एप्रिल 2017 रोजी आरोपी हा तरवडी कुकाणा रोडवर रात्री साडेनऊच्या सुमारास 3 हजार 961 रुपये किंमतीचे 190 लिटर रॉकेल विनाक्रमांकाच्या टाटा जीपमधून कांद्याच्या गोण्यांमध्ये घेवून जात असताना मिळून आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे करत आहेत. यापूर्वी अनेकदा काळ्या बाजारात जाणारे धान्य पकडण्यात आले. मात्र काहीही कारवाई झाली नव्हती. यावेळी तसे होवू नये सार्वजनिक वितरणासाठी असलेल्या सरकारी मालाची काळ्या बाजारात विक्री करणार्‍यांवर वचक बसला पाहिजे अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*