पुणे : विद्यार्थ्याने शिक्षकांवर केला कोयत्याने हल्ला

0

पुण्यातील वाघोली परिसरात शुक्रवारी एका विद्यार्थ्याने शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाघोली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

येथील वाडेबोलाई परिसरातील जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात हा प्रकार घडला.

या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थी फरार झाला असून लोणीकंद पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या सुनील पोपट भोर या विद्यार्थ्याला दर्शन चौधरी आणि धनंजय आबनावे या शिक्षकांनी खडसावले होते.  डोक्यावरचे केस वाढवल्यामुळे दोन्ही शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी त्याला समज दिली होती. याचाच राग सुनीलच्या मनात होता. आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात परतत होते. त्यावेळी सुनीलने त्याच्याजवळील ऊस तोडण्याच्या कोयत्याने दर्शन चौधरी आणि धनंजय अबनावे यांच्यावर वार केले. यात दोन्ही शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

*