पुणे : कोपर्डीत निर्भयाच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध; भय्यूजी महाराजांचा पुतळा जाळला

0

कोपर्डी घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.

त्यानिमित्तानं भय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवाराकडून कोपर्डीच्या निर्भयाचं स्मारक उभारण्यात आलं आहे. मात्र पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचं स्मारक कसं काय उभं राहू शकतं असा सवाल संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केला आहे.

कोपर्डीतील स्मारक हा निव्वळ मूर्खपणा आहे. १३ जुलै रोजी यासंदर्भात आयोजित कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा तो उधळून लावू. कोणत्याही परिस्थितीत स्मारक होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकात म्हटले आहे की, ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात स्मारकास विरोधाचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.

संभाजी ब्रिगेडने पुण्यात भय्यूजी महाराजांचा पुतळा जाळला.

त्याचबरोबर आज कोपर्डीत होणारा स्मारक अनावरणाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाचं भूमिपूजन झालं आहे.

साधारणपणे 50 बाय 50 फूटाचं स्मारक बांधण्याचा प्रस्ताव आहे. स्मारकाच्या मध्यभागी पितळी धातूचा पुतळा बसवण्यात येणार आहे. स्मारकाशेजारीच लिंबाचं झाडही असेल. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात क्रांतिकारी संघर्षाचं प्रतीक म्हणून हे स्मारक ओळखलं जाणार आहे. पीडित कुटुंबीयांच्या शेतात हे स्मारक बांधण्यात येत आहे.

दरम्यान, कोपर्डी प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन लवकरात लवकर आरोपींना फाशी देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

LEAVE A REPLY

*