पुणे-अमरावती सुपरफास्ट रेल्वे

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – मध्य रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोईसाठी पुणे-अमरावती-पुणे ही वातानूकुलित सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू केली आहे. त्याच बरोबर अजनी-पुणे-अजनी ही गाडी धावणार आहे. या दोन्ही गाड्या साप्ताहिक आहेत.
उद्या सायंकाळी रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
पुणे अमरावती ही गाडी बुधवारी पुणे स्टेशनवरून सुटेल. ती 4.20 वाजता दौंडला पोहोचेल. नगर स्थानकावर 5.52 वाजता येईल. तीन मिनिटांच्या थांब्यानंतर ती प्रस्थान ठेवेल. मनमाडला साडेआठ वाजता, जळगावला 10 वाजता, भुसावळला पावणेअकरा वाजता, अकोल्यात पावणे एकला, बडनेराला पहाटे अडीच वाजता पोहोचेल. गुरूवारी अमरावती येथे पहाटे सव्वा तीन वाजता जाईल. ही गाडी पुन्हा साडेसहा वाजता अमरावतीहून सुटेल. ती कोपरगावला अडीच वाजता, नगरला 4 वाजून 10 मिनिटांनी येईल.
दुसरी गाडी अजनीहून मंगळवारी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. ती कोपरगावात 6 वाजून 38 मिनिटांनी येईल. दौंडला 10 वाजता जाईल. बुधवारी पुणे स्टेशनला पावणेअकरा वाजता जाईल.

LEAVE A REPLY

*