पुणतांब्याच्या धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस

0

पदाधिकार्‍यांसह विविध संघटनांचा आदोलनाला पाठिंबा

 

पुणतांबा (वार्ताहर)- पुणतांबा येथे सुरु असलेल्या धरणे आदोलनाच्या दुसर्‍या दिवशी राज्यातील पदाधिकार्‍यांसह विविध संघटना धरणे आदोलनाला व एक जूनपासून सुरू होणार्‍या शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा दिला तसेच संपात वेळप्रसंगी सक्रिय होण्याचे सूतोवाच केले.
गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍यामुळे धरणे आंदोलनासाठी उभा केलेला मंडप जमीनदोस्त झाला होता सकाळी 9 वाजता शेतकरी वर्गाने पारिश्रम करून मंडप उभा केला व त्यानंतर 11 वाजता धरणे आदोलन सुरू झाले प्रास्ताविक धनंजय जाधव यांनी केले. त्यानंतर काही वेळेतच खा.सदाशिव लोखंडे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करून सेनेचा ह्या आंदोलनाला पाठिंबा असून उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथील अधिवेशनात संपाबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे. सेना शेतकर्‍यांबरोबर आहे याचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला.

 

त्यानंतर औरंगाबाद येथील अन्नदाता संघटनेचे संस्थापक जयाजी सूर्यवंशी यांनी एक तास भाषण करून शेतकर्‍यांच्या समस्यांची माहिती दिली संप फोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना योग्य उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला.
मराठा क्रांतीचे समन्वयक शांताराम कुंजीर तसेच विजय काकडे यांनीही मनोगत व्यक्त करून शेतकर्‍यांनी आरपारची लढाई समजून संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले दुपारच्या सत्रात हमालमापाडी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी भाषण केले शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची त्यांनी प्रशंसा करून आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला.
कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीही पुणतांबेकरांनी सुरू केलेल्या आंदोलनाची इतिहासात नोंद होईल असे स्पष्ट केले. सेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला. सुहास वहाडणे यांनी आभार मानले. आजच्या धरणे आंदोलनात पंचक्रोशीतील अनेक गावांतील शेतकरी, विविध संघटनांचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धरणे आंदोलनात सहभागी शेतकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्था चितळी व जळगावच्या ग्रामस्थांनी केली होती.

 

धरणे आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी किसान क्रांतीचे राज्य समन्वयक पदाधिकारी तसेच पुणतांबा येथील अनेक संघटना संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

LEAVE A REPLY

*