पुणतांबा येथील खत प्रकल्पाला चालना देणार ः मुख्यमंत्री फडवणीस

0

पुणतांबा (वार्ताहर)- पुणतांबा येथील नियोजित खत प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

 
पुणतांबा परिसरातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, सुभाष वहाडणे, विजय धनवटे, भाऊसाहेब केरे, एस.आर.बखळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

 
1 वर्षापूर्वी प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा नियोजित खत प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

 

 
प्रकल्पासाठी त्यावेळेस दहा कोटींची तरतूद करण्यात आली होती व वर्षभरात हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षीत होते. मात्र सत्तांतरामुळे हा प्रकल्प रेंगाळल्याचे सर्वांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यांनी शिष्टमंडळाने दिलेले निवेदन वाचून तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या व मी या प्रकल्पात लक्ष घालीन असे आश्‍वासन दिले. यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

ना. विखे कृषीमंत्री असताना त्यांनी अंदाजे 37 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे 25 ऑगष्ट 2014 रोजी भूमिपूजन केले होते. मात्र सत्तांतर झाल्यामुळे हा प्रकल्प तीन वर्षांपासून रखडला होता. ही बाब ना. विखे व शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पुणतांबा वाकडी रस्त्यालगत अदांजे दहा एकर क्षेत्रात हा कस्टमाईज्जड खत प्रकल्प उभा राहणार आहे. 

LEAVE A REPLY

*