Type to search

क्रीडा

पी.व्ही.सिंधू, एच.एस.प्रणॉयची विजयी सलामी

Share

हाँगकाँग । भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधून हाँगकाँग ओपन स्पर्धेत विजयी सुरूवात केली. तिने पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाची किम गा ईयूनचा पराभव केला. या विजयासह सिंधू आता दुसर्‍या फेरीत पोहोचली आहे. तर पुरुष एकेरीत भारताच्या एच.एस. प्रणॉयने चीनच्या खेळाडूचा पराभव करत दुसरी फेरी गाठली.

सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या पी. व्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हिला 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले.

सामन्यात पी. व्ही सिंधूने चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूला 21-15, 21-16 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसर्‍या फेरीत सिंधूचा सामना थायलंडच्या बुसनान ओंगबारुंगफान हिच्याशी होणार आहे.

36 मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूने किमचा 21-15, 21-16 ने पराभव केला. दरम्यान, चार लाख डॉलर बक्षिस असलेल्या या स्पर्धेत सिंधू दुसरया फेरीत पोहोचली असून तिचा पुढील सामना थायलंडची बुसानन हिच्याशी होणार आहे.

पुरुष एकेरीत प्रणॉयने चीनच्या हुआंग यू शियांगचा पराभव केला. त्याने 44 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 21-17, 21-17 ने बाजी मारली. दरम्यान, प्रणॉय पुढचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीशी याच्याशी होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!