पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा

0

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज सकाळी छापा टाकला आहे.

चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत.

टीव्ही वृत्तानुसार एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी सीबीआयने देशभरात ८ ठिकाणी छापे मारले असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

*