Type to search

आरोग्यदूत

पित्ताशयाचे खडे

Share
आपल्या शरीरातील लिव्हरला लागून असलेला पित्ताशय हा छोटासा अवयव. पित्ताशयाचे कार्य हे पित्त तयार करायचे नसून पित्त साठवणे हे आहे. आपल्या पित्तात कोलेस्ट्रालचे प्रमाण किंवा बिलीरुबीनचे प्रमाण जास्त झाले तर पित्ताचे खडे तयार होऊ शकतात. तसेच जेवणाच्या अनियमित वेळा वजनात अचानक झालेली वाढ किंवा कमी वेळेत जास्त वजन कमी झाल्यास पित्ताचे खडे तयार होऊ शकतात.

लक्षणे ः पित्ताशयातील खडे हे बर्‍याच वेळा कुठल्याही लक्षणाशिवाय शांत असतात व पेशंटला कुठलाही त्रास होत नाही. त्या पेशंटची काही वेगळ्या कारणाकरिता पोटाची सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन केल्यास खडें आढळून येतात याला खपलळवशपींरश्र षळपवळपस म्हणतात.

पित्ताशयातील खड्याचा त्रास हा वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकतो. पोटात फुगल्यासारखे वाटणे, पोटाच्या वरच्या भागात दुखणे जेवणानंतर अस्वस्थता ही सौम्य लक्षणे झालीत. जेवणानंतर साधारण 2 ते 3 तासांनी पोटाच्या उजव्या बाजूला वरील किंवा मधोमध अचानक दुखायला लागणे, मळमळ किंवा उलटी होणे, कधी कधी पाठ दुखणे हे पित्ताशयातील खड्यांमुळे येणारे लक्षणे आहेत. तेलकट तुपाचे पदार्थ खाल्ल्यानंतर साधारण हे लक्षणे सुरू होतात.

धोका ः खड्यांच्या आकारानुसार व संख्येनुसार विविध प्रकारचा धोका असतो. खूप मोठे (दीड ते दोन सेमी) खडे असल्यास कालांतराने पित्ताशयाच्या कॅन्सरचा धोका असतो. छोटे छोटे (2 ते 4 मिमी चे ) खडे पित्ताशयातून सरकून पित्ताच्या नळीत फसू शकतात. त्यामुळे काविळ किंवा स्वादुपिंडाचे इन्फेक्शन होऊन जीवघेणा त्रास होऊ शकतो.
उहेश्रशलूीींळींळी म्हणजे पित्ताशयाचे इन्फेक्शन. हा सगळ्यात जास्त आणि कायम आढळणारा त्रास आहे.
काय करावे काय करु नयेः-
जेवणाच्या वेळा पाळाव्यात. जास्त तेलकट, तळलेले दुधाचे पदार्थ टाळावेत. त्रास देणार्‍या पित्ताशयातील खड्याची त्वरित दखल घ्यावी व आपल्या डॉक्टरांना दाखवावे. त्रास न देणार्‍या खड्यांचा सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावा. जास्त उपवास व एकाच वेळी खूप जास्त खाणे टाळावे.

उपचार-
साधारणतः त्रास देणार्‍या खड्यांचा उपचार हा ऑपरेशन हाच आहे. ज्यात दुर्बिणीने ऑपरेशन करून रुग्णास बरे केले जाते. साधारण 10 व 5 मिमी च्या छोट्या खड्यातून ही शस्त्रक्रिया होते. त्रास न दिलेल्या ( डळश्रशपीं ऋरश्रश्र डीेंपशी ) खड्यांचा उपचार हा त्याच्या आकारमानानुसार व संख्येनुसार ठरतो. वर नमूद केलेल्या धोकादायक परिस्थितीतील खड्यांमध्ये ऑपरेशन हा पर्याय बर्‍याच वेळा फायद्याचा ठरतो. काही ठराविक केसेमध्ये गोळ्या देऊन पित्ताशयातील खडे विरघळविण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यात ठराविक अंतराने पोटाची सोनोग्राफी करुन खड्यांचे आकारमान व संख्या कमी होते आहे की नाही याची खात्री केली जाते.

पित्ताच्या नळी खडा फसून काविळ झाल्यास एपवेीलेिू म्हणजे एठउझ करुन तो खडा त्वरीत काढावा लागतो. वजन प्रमाणात ठेवून जेवणाच्या वेळा पाळल्या तर पित्ताशयाच्या खड्यांपासून तुम्ही दूर राहू शकता.

पित्ताशयातील खड्यांच्या बाबतीत काही गैरसमज आहेत. जसे खडे पडणे किंवा पाडण्यासाठी औषधोपचार केले जातात, परंतु हे साफ चुकीचे आहे. पित्ताशयातील खडे खाली सरकता कामा नये. जर चुकून खडा खाली सरकून पित्ताच्या नळीत अडकला तर जीवघेणा त्रास होऊ शकतो किडनीतील खड्यांना हा नियम लागु होत नाही. पित्ताशयातील खडे काढतांना किडनीतील खड्यांसारखे फक्त खडे न काढता पित्ताशय देखील काढले जाते आणि हीच योग्य पद्धतही आहे. कारण पित्ताशयाचे कार्य पित्त तयार करायचे नसून साठवणे व वेळोवेळी पुरवठा करणे हे असल्यामुळे रुग्णाच्या पचनक्रियेत बिघाड होत नाही.
डॉ. सचिन देवरे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!