पिंप्रीं अंचला युवकाच्या अंगावर भिंत पडून जागीच ठार

0

वणी (प्रतिनिधी):  पिंप्रीं अंचला ता. दिंडोरी येथे  शेख हुसेन अकिल (वय १९ ) हा युवक घराची भिंत उस्तरत होता थोडया क्षणाची विश्रांती घेण्यासाठी भिंतीच्या आडोशाला बसलेला होता आणि काही क्षणातच तीच भिंत त्याच्या अंगावर पडल्याने तो जागीच ठार झाला.

हुसेन हा पिंप्री अंचला येथे आपली आई बहिण व भाऊ यांचे सोबत एकत्रीत राहात होता हुसेन लहान असतानांच त्याचे पितृछत्र हरपले होते स्वतः मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असे. घरची परिस्थिती बेताचीच होती मजुरी करून आईसह लहान भाऊ व बहिणींची जबाबदारी हुसेनवर होती.

पिंप्रीअंचला येथे त्याला बेघर मंजूर झाल्याने राहाते घराच्या जागेवर बेघर बांधण्यासाठी उस्तरण्याचे काम तो करत होता दरम्यान थोडावेळ विश्रांती घेण्यासाठी भिंतीच्या आडोशाला बसला व काही वेळातच ती भिंत हुसेनच्या अंगावर कोसळली अन् तो जागीच गतप्राण झाला भित पडण्याचा आवाज आल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. व तात्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकिय अधिकारी डॉ राजेंद्र बागूल यांनी तपासणी करून मयत झाल्याचे घोषित केले शवविच्छेदना नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले हुसेनवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे .याबाबत अधिक तपास वणी पोलीस करीत आहे .

LEAVE A REPLY

*