पिंप्राळ्यातील बंद तलाठी कार्यालयाला हार घालून राष्ट्रवादीचे आंदोलन

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-शहरातील पिंप्राळा तलाठी कार्यालयाच्या दरवाज्यावर 15 दिवसांपासून पाच दिवस सुट्टीची नोटीस लावली असून तलाठी येत नसल्याने कार्यालय बंद आहे.
त्यामुळे दाखले घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पिंप्राळा तलाठी कार्यालयाला हार घालून नारळ फोडून आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
इयत्ता 10 वी 12 वीच्या निकाल लागला असून पालकांच्या त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासते. यात तलाठी कार्यालय गेल्या 15 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

तलाठी यांची नियुक्ती नसल्याने कार्यालय बंद असल्याचे समजते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पिंप्राळा तलाठी कार्यालय येथे निुयक्त केलेल्या तलाठी यांना लवकरात लवकर रुजु होण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले यांच्या नेतृत्वाखाली पिंप्राळा तलाठी कार्यालयाला घालून त्याठिकाणी नारळ फोडण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवदेनावर राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे, नगरसेविका प्रतिभा कापसे, शोभा बारी, मुक्तारबी पठाण, लता मोरे, शरीफ पिंजारी, आबा कापसे, अतुल बारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*