पिंपळनेर येथे हातभट्टी दारुचे अड्डे उद्ध्वस्त

0
पिंपळनेर / पिंपळनेर परिसरात दोन ठिकाणी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यामुळे हातभट्टी अड्डे चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चिकसे-जिरापूर गावचे शिवारात पांझरा नदीपात्रालगत गावठी हातभट्टी दारु शोध मोहीम राबविण्यात आली.
त्या दरम्यान प्रविण बाबुलाल निकम रा. काकासट भिलाटी व पिन्टू जान्या सोनवणे रा. लोणेश्वर भिलाटी पिंपळनेर हे भट्टी पेटवुन गावठी हातभट्टीची दारु तयार करतांना मिळुन आले आहे.
त्यांच्या जवळून 120 लिटर गावठी हातभट्टीची दारु, 08 पत्र्याचे मोठे ड्रम, 04 प्लास्टिक ड्रम, 85 लहान पत्र्याचे डब्बे, याप्रमाणे गावठी हातभट्टी ची दारु तयार करण्याचे रसायन व साधनसामूग्री असे एकुण 44640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला असुन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच सकाळी 08.30 सुमारास चिकसे रोडवर जगन शामा शिंदे रा. पानथळ भिलाटी हा गावठी हातभट्टीची दारुची वाहतुक करतांना मिळुन आला त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याच्या कडून 30 लिटर गावठी हातभट्टी ची दारु 1200 रु. किंमतीची मिळुन आली. सदर कारवाई पिंपळनेर पोलिस ठाण्याचे एपीआय सुनिल भाबड, पीएसआय योगेश खरकर, ललित पाटील, भूषण वाघ, सागर ठाकूर, यांच्या पथकाने केली.

पिंपळनेर परिसरात हातभट्टी दारुचे अड्डे चालु देणार नाहीत. ते लगेचच उद्ध्वस्त करण्यात येतील. यामुळे दारुबंदीला मदत होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*