Type to search

धुळे

पिंपळनेर मार्केटमध्ये कांद्याला २४०० रूपये भाव

Share

पिंपळनेर | साक्री तालूक्यातील पिंपळनेर उपबाजार समितीत आज कांदा दोन हजार ते दोन हजार चारशे रूपये भाव शेतकर्‍यांना मिळाला आहे. मार्केटमध्ये आवक देखील वाढली आहे.

यापुर्वी शेतकर्‍यांना काद्यांला हजार, अकराशे, ते पंधराशे रूपये मिळाला होता. परंतु ठराविक शेतकर्‍यांजवळ चाळ असल्याने त्यांनी कांदा साठवून ठेवला. त्यांनी आज मार्केट मध्ये कांदा विक्रीला आणला. त्यांना दोन हजार ते दोन हजार चारशे रूपये भाव मिळाला.

बहुतेक कांदा हा व्यापार्‍यांजवळच शिल्लक आहे. त्यांनी चाळी भरून ठेवल्या आहेत. अजुन काद्याला भाव मिळणार म्हणून ते कांदा मार्केटमध्ये आणत नाहीत. असे जाणकारांकडून सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!