पिंपळे गुरवमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

0

आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरवमध्ये योगेश शेलार या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे.

दोन अज्ञातांनी हा गोळीबार केला असून गोळीबारामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

योगेश शेलार तुळजाभवानी मंदिरातून देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडत होते. यावेळी स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

यात शेलार यांच्या पायाला गोळी लागली आहे.

 

LEAVE A REPLY

*