पासपोर्ट कार्यालय आले माघारी!

0

पोस्ट कार्यालयात लवकरच केंद्र

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरकरांना आता पासपोर्ट बनवण्यासाठीचा त्रास कमी होणार आहे. कारण, केंद्र सरकारने 50 किलोमीटर अंतरापर्यंत पासपोर्ट केंद्र सुरु करण्याची घोषणा केली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 149 पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांची घोषणा नुकतीच केली. त्यात अहमदनगरसह राज्यातील 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. नगरच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट लवकरच सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगर येथे पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे यासाठी खासदार दिलीप गांधी हे गत दोन वर्षापासून परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करत होते. त्यामुळेच नगरला पासपोर्ट कार्यालयास केंद्राने मंजुरी दिल्याची माहिती नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी दिली. नगरच्या मुख्य पोस्ट कार्यालयात त्यासाठी जागा दिली जाणार असून लवकरच ते कार्यान्वीत होईल असे गांधी यांनी सांगितले. त्यामुळे नगरकरांना पासपोर्ट काढण्यासाठी आता पुण्याला जाण्याची गरज नाही. नगरला पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यानंतर नगरकरांना वेळ

व पैशाची बचत होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने पहिल्या टप्प्यात 86 ‘पीओपीएसके’ सुरु करण्यात आली आहेत. परराष्ट्र खाते आणि पोस्ट ऑफिसच्या संयुक्त विद्यमाने ते सुरु करण्यात येणार आहेत. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र खात्याची सूत्रे हाती घेतल्यापासून 16 नवीन पासपोर्ट कार्यालये सुरु केली आहेत. याआधी देशात एकूण 77 पासपोर्ट कार्यालय आहेत. त्यातच आता नव्या 149 पासपोर्ट कार्यालयाची घोषणा करण्यात आली आहे.
कोणालाही पासपोर्ट बनवण्यासाठी 50 किलोमीटरपेक्षा जास्त दूर जावं लागू नये या हेतूने हे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तिसर्‍या टप्प्यात आणखी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येतील, अशीही माहिती स्वराज यांनी नव्या पासपोर्ट कार्यालयांची घोषणा करताना दिली.

 

LEAVE A REPLY

*