Type to search

जळगाव

पावसाच्या सावटामुळे शहरातील मतदान केंद्रांवर धिम्या गतीने मतदान

Share

जळगाव । विधानसभेसाठी आज प्रारंभी सकाळी शहरातील जवळपास सर्वच केंद्रांवर मतदान अत्यंत धिम्या गतीने सुरू होते. सर्वत्र शांततेत मतदान सुरू होते. कुठलाही गोंधळ, अथवा गाजावाजा झालेला नाही, सर्व मतदान प्रक्रिया दुपारी 4 वाजेपयर्र्त संथ व शांततेत सुरू होते. पावसाच्या सावटामुळे मतदानावर परिणाम झाला असल्याचे चित्र होते. सकाळी 7 वाजता ते 11 वाजेपयर्र्त मतदान केंद्रावर अगदी अल्प प्रमाणात मतदार दिसून येत होते. रांगा कुठेच दिसत नव्हत्या. मतदारांमध्ये एकप्रकारे निरुत्साहच दिसून येत होता. तसेच वातावरणही ढगाळ होते त्यामुळे पावसाच्या सावटाखाली मतदार वावरत होते. त्यामुळे मतदान शक्यतो कमी होणार असल्याचे दिसून येत आहे. ऐरव्ही असणारे निवडणुकीचे वातावरण यावेळी दिसून आले नाही. जो जोश निवडणुकीत असतो तो यावेळी दिसून आला नाही. मतदारांत कमालीचे संभ्रमाचे वातावरण दिसून आले. मतदान करण्यासाठी निघालेल्या मतदाराच्या मनात कुणाला मतदान करावे याबाबत रांगेत उभे राहिल्यानंतरही मतदारांचे मनात निश्चित होत नव्हते. तर काही मतदारांच्या मते मतदान करणे हा आपला हक्क आहे एवढेच सांगत होते. यावेळी जवळपास सर्वच पक्षात संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून आले. तसेच आत्मविश्वास दुणावल्याने इतर राजकीय पक्षांसह उमेदवारांमध्ये व्दिध्दा अवस्था होती. अनेक मतदारांना तर उमेदवारांचीही ओळख नव्हती, नावही लक्षात राहत नसल्याचेही काही मतदारांनी बोलून दाखवले.

केंद्रानिहाय झालेले मतदान
चौबे शाळेतील दुपारी साडे बारा वाजता मतदान क्र. 121 वर 154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता तर क्रमांक 120 वर 152, मतदान केंद्र क्र. 119 वर 84 पुरुष व 35 स्त्रिया असे मिळून 119 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे 119 व्या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 119 मतदारांनीच 12.40 पयर्र्त मतदान केले होते. मतदान केंद्र क्र. 118 वर 157 मतदारांनी हक्क बजावला. 117 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 113 पुरुष व 87 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला.

येथे 200 मतदार म्हणजे 15.56 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला, मतदान केंद्र क्र. 116 वर 223 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 155 पुरु, 68 महिला आहेत. चौबे शाळेपुढील उर्दू शाळा क्र. 69 मध्ये 12.45 पयर्र्त 183 मतदारांनी आपला हक्क बजावला, यात 112 पुरुष व 71 स्त्रियांचा समावेश आहे. तर मतदान केंद्र क्र. 67 मध्ये 132 मतदारांनी आपला हक्क बजावला, तसेच मतदान केंद्र क्र. 66 मध्ये 162 जणांनी आपला हक्क बजावला यात 103 पुरुष तर 59 महिलांचा समावेश आहे, तर मतदान केंद्र क्र. 127 वर 60 मतदारांनी आपला हक्क बजावला, तर मतदान केंद्र क्र. 126 वर 1 वाजेपयर्र्त फक्त 40 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात 25 पुरुष तर 15 महिलांचा सहभाग आहे.

तर मतदान केंद्र क्र. 122 मध्ये 132 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. इस्लामपुरा उर्दू शाळेत 1 वाजेपयर्ंत 190 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 134 पुरुष तर 56 स्त्रियांचा सहभाग आहे तर मतदान केंद्र क्र. 124 वर 106 मतदार पुरुष तर 47 महिला यांनी मतदानाचा हक्क बजावला जवळपास 153 जणांनी मतदान केले. तर मतदान केंद्र क्र. 114 वर 235 जणांनी मतदान केले या केंद्रांवर मात्र सर्वात जास्त गर्दी ही मतदारांची दिसून आली. व झालेले मतदानही या शाळेतील इतर केंद्रापैकी या केंद्रावर अधिक होते. तर मतदान केंद्र क्र. 110 वर 175 जणांनी आपला हक्क बजावला. यात 120 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे. तर मतदान केंद्र क्र. 111 वर 136 मतदारांनी आपला हक्क बजावला. लिधूरवाड्यातील शाळा क्र. 3 मध्ये 121 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 195 जणांनी 1 वाजेपयर्र्त आपला हक्क बजावला होता. यात 121 पुरुष तर 74 महिलांचा समावेश आहे. तर मतदान केंद्र क्र. 70 वर 335 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर यात 200 पुरुष तर 137 महिलांचा समावेश होता. तर मतदान केंद्र क्र. 98 वर 325 जणांनी आपला हक्क बजावला.

यात 194 पुरुष तर 151 स्त्रियांचा समावेश आहे. रथ चौकातील राम मंदिराच्या शाळेतील मतदान केंद्र क्र. 109 मध्ये 175 मतदारांनी आपला हक्क बजावला. तर मतदान केंद्र क्र. 100 वर 218 मतदारांनी 1.30 वाजेपयर्र्त मतदान केले. हे मतदान 20.7 टक्के होते. मतदान केंद्र क्र. 101 वर 209 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 137 स्त्रिया तर 72 पुरुष यांचा समावेश आहे. तर मतदान केंद्र क्र. 102 वर 161 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात 99 पुरुष तर 62 स्त्रियांचा समावेश आहे. तर 103 मतदान केंद्रावर 199 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 1.40 वाजेपयर्र्त 119 पुरुष तर 80 स्त्रियांचा समावेश आहे तर मतदान केंद्र क्र. 104 वर जवळपास 270 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वच मतदान केंद्रामध्ये येथील आकडेवारीचा सर्वाधिक उच्चांक आहे. तर मतदान केंद्र क्र. 105 वर 224 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 136 पुरुष तर 88 स्त्रियांचा यात समावेश आहे.

पुरुष-महिला मतदारांचे समप्रमाण
का. उ. कोल्हे विद्यालयात मतदान केंद्र क्र. 83 येथे 200 पुरुष व 200 महिलांनी मतदान केले. एकूण 400 मतदान झाले. येथेही मोठ्या प्रमाणावर मतदारांची गर्दी दिसून आली विशेष म्हणजे येथे समसमान म्हणजे पुरुष व महिलांनीही समप्रमाणात मतदान केले. पुरुष व महिलांचे प्रमाण या केंद्रावर सारखेच असल्याचेही दिसून आले. पुरुष व महिलांकडून सारखे व समान मतदान झाल्याचा हा योगायोग आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!