पालिकेच्या वकिलाकडूनच डॉक्टरांना कायद्याचे धडे

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- रुग्णालयाच्या नियमबाह्य बांधकामावर एकीकडे कारवाई सुरू असताना पालिकेच्या वकिलानेच डॉक्टरांची बैठक घेत त्यांना कारवाई विरोधात कायद्याचे धडे दिले. याचिकाकर्ते शाकीर शेख यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
शहरातील रुग्णालयाच्या नियमबाह्य बांधकामावर हातोडा टाकण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने महापालिकेने रुग्णालय इमारतीवर हातोडा टाकून त्याचा अहवाल सादर करण्याचे बजावले आहे. दुसर्‍या सुनावणीवेळी कारवाईस स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दर्शविला आहे. कोर्टाच्या या आदेशाने डॉक्टर कोमात गेले आहेत. काय करावे हेच त्यांना सुचेना. महापालिकेच्या एका वकिलाने आज सावेडीतील एका हॉटेलात डॉक्टांची बैठक घेत त्यांना कायद्याचे धडे दिले. नवीन याचिका दाखल करावी असा सल्ला देत स्थगितीसाठी कोणते पाऊल उचलले पाहिजे याचे धडे दिले. महापालिका एकीकडे रुग्णालयावर हातोडा टाकत असताना महापालिकेच्याच वकिलाने विरोधी डॉक्टर पार्टीला कायद्याचे धडे देणे कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

*