पालिकेच्या तळ्यात बुडून मुलाचा मृत्यू

0

रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे सत्र सुरुच; बघणार्‍यांची गर्दी

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर भागात असलेल्या श्रीरामपूर नगरपरिषदेच्या साठवण तलावात एका 15 वर्षीय लहान मुलाचा पाण्यात पडून मृत्यू झाला. या मुलाचा मृतदेह खाली गाळात रुतून बसल्याने रात्री उशिरापर्यंत मिळू शकला नाही. मृतदेह शोधण्यासाठी शासकीय, महसूल व पालिकेच्या यंत्रणेसह पोहाणार्‍या आठ दहा जणांनी अथक प्रयत्न केले; परंतु रात्री अंधारामुळे मृतदेह शोधण्याचे काम बंद करण्यात आले.
काल सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरातील मिल्लतनगर भागात असलेल्या श्रीरामपूर नगरपरिषदेच्या साठवण तलावात एक मुलगा अचानक पडला आणि तो कोलांड उड्या खावू लागला. त्यात दूरवर असलेल्या त्याच्या एका लहान मुलाने पाण्यात मुलगा पडत असल्याचे पाहून त्याने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. काही जणांनी त्या ठिकाणी येवू पाहिले तर काहीच दिसले नाही तरीही पोहणार्‍या तिघा चौघा जणांनी पाण्यात उड्या घेवून त्याचा शोध घेवू लागले. त्यानंतर ही बातमी जसजशी पसरु लागली तसतशी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी वाढू लागली. तातडीने पालिकेच्या अग्निशमन सेवा दल, पाणी पुरवठा तसेच इतर विभागाच्या लोकांनी बोलावून घेतले. तहसीलदारांना याबाबतची माहिती दिली. तहसीलदार सुभाष दळवीही घटनास्थळी तातडीने हजर झाले.

 

त्या अगोदर रियाज पठाण, संजय छल्लारे, यांच्यासह त्या भागातील कार्यकर्ते जमा झाले. पंतप्रधान आवास योजनेचा कार्यक्रम चालू असतानाच या घटनेची माहिती मिळताच आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, नगरसेवक राजेंद्र पवार, दिपक चव्हाण, वैशाली चव्हाण, अर्चना पानसरे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्तार शहा, प्रकाश ढोकणे, अल्तमेश पटेल, रमजान शहा, तहसीलचे देशमुख हेही त्या ठिकाणी तातडीने पोहोचले सर्व पालिकेतील अधिकार्‍यांना सुचना देवून यंत्रणा ताबडतोब कामाला लावण्याबाबत सूचना केली.यावेळी या मुलास काढण्यासाठी शहरातील प्रसिध्द व्यापारी मोहनशेठ कुकरेजा, भाऊसाहेब वाघमारे, यांच्यासह मोहसीन शहा, आदम शहा, अंजूम शहा, अनिस सय्यद, इजाज काझी, शाकहरुक शेख, शहेबाज शहा, पालिकेची शिंदे, पिंपळे यांनी पाण्यात उड्या मारुन तब्बल दीड ते दोन तास मृतदेह शोधण्याचे काम करत होते.

 

त्यासाठी वीज वितरणचे अधिकारी व कर्मचार्‍या त्या ठिकाणी हजर झाले. त्या ठिकाणी तातडीने लाईटची व्यवस्था करण्यात आलीण परंतु रात्री उशिर झाल्याने मृतदेह शोधण्याचे काम बंद करण्यात आले आता पहाटे सहा वाजता पुन्हा मृतदेह शोधण्यासाठी हे पोहाणारे जलतरणपटू आपली कार्यवाही सुरु करणार आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक श्री. लाखेंडे यांनी तातडीने पोलीस पाठवून बंदोबस्त तैनात केला होता.
हा मुलगा या भागातील सचिन मकासरे (वय 16) नावाचा असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर त्याची शहनिशा होवू शकणार आहे. परंतु काही जणांनी त्यास त्या जागेवर पाहिलेही होते त्यामुळे जो मुलगा बुडाला तो सचिनच असण्याची शक्यता आहे. सचिन हा घरातून निघतांना शौचालयासाठी निघाला होता शौचालयासाठी त्याने जो डबा नेला होता तो त्या घटनास्थळाच्या ठिकाणी आढळून आला. त्याच्या आईने तो डबा पहातातच हाच डबा सचिनने नेला असल्याचे सांगितले. सचिनच्या घरात आई, आजी, आजोबा, दोन भाऊ असा परिवार आहे. मोठा भाऊ हा गवंडीचे काम करतो घरची परिस्थिती गरिबीची आहे. परंतु सचिनचा मृतदेह ताबडतोब मिंळावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते.

LEAVE A REPLY

*