पालखेडमधून 150 दलघफु पाण्याचा विसर्ग

91 किलोमीटर अंतरावर पोहचले पाणी , 10 मे पर्यत सुरू राहणार आवर्तन

0

नाशिक : पालखेडमधून शनिवारी सोडण्यात आलेल्या पाणी मंगळवारी सायंकाळपर्यंत 91 किमी अंतरावर पोहचले आहे. तीन दिवसात जवळपास   150 दलघनफूट इतक्या पाण्याचा विसर्ग झाला असून 10 मेपर्यंत पाणी सुरुच राहाणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 60 तासांत हे पाणी इच्छित स्थळी पोहचणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

येवला, मनमाड शहरासह पाणीपुरवठा योजनांना पालखेड धरणातून रविवारी सायंकाळी पाणी सोडण्यात येणार असून, साधारणत: दहा दिवस डाव्या कालव्याच्या मार्गे झेपावणार्‍या या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून कालव्याच्या दुतर्फा गावातील वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच, कालव्यात चोरून डोंगळे टाकण्यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. पालखेडमधून  मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे,येवला नगर परिषद,  38 गाव पाणीपुरवठा योजना, लासलगाव आणि निफाड तालुक्यातील प्रासंगिक काही गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.

या पाण्याची चोरी होण्याची शक्यता विचारात  घेता पालखेड पाटबंधारे, महसूल, पोलीस यांच्या मदतीने दोन हजारावर डोंगळे काढण्यात आले आहे. पाणी सुटल्यापासून  कालव्यांवर  पालखेड पाटबंधारे विभाग, महसूलचे, विज वितरणचे  मिळून  कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहे.

त्यांच्यासोबत 50 पोलीस कर्मचारीही सतत गस्तीवर आहेत. भरारी पथकांसोबतच या सर्वांची सुरक्षेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 10 मेपर्यत त्यांची नियुक्ती राहाणार आहे. कालव्यावरिल शेवटचे ठिकाणी येवला नगर परिषद हे  95  किमी अंतरावर आहे. तिथपर्यंत पाणी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाणी पोहचणार असल्याचे पाटबंधारे   विभागाच्या वतीनेही सांगण्यात आले आहे.

पाणी शेवटच्या ठिकाणापर्यंत म्हणजे येवला नगर परिषदेच्या साठवण तलावात भरल्यानंतर खालच्या बाजूने भरत भरत वरच्या भागाकडे येणार आहेत. त्यानुसार प्रथम येवला नगरपालिका, त्यानंतर मनमाड नगरपालिका,  गाव पाणी पुरवठा योजना, त्यानंतर मनमाड रेल्वे, लासलगाव आणि या कालव्यावरील निफाड तालुक्यातील प्रासंगिक गावांसाठी पाणी दिले जाईल. सध्यस्थितत तरी पाण्याची चोरी झाली नसल्याने अगदी ठरल्या वेळेनुसार पाणी त्या-त्या पाणीवापर संस्थेला पोहचले आहे. जवळपास  ते  दलघनफूट पाण्याचा विसर्ग  मंगळवारी सायंकाळी  7 पर्यंत झाला होता.

LEAVE A REPLY

*