Type to search

आरोग्यदूत

पार्किन्सन रुग्णांनी काय खावे?

Share

आजाराच्या सुरुवातीच्या काळात बर्‍याचदा निदान करणे अवघड असते. पार्किन्सन रुग्णांची सतत तपासणी आणि ओैषधोपचाराला प्रतिसाद यामुळे नक्की निदान करता येते. गरज पडल्यास एमआरआय, सीटी स्कॅनसारख्या तपासण्या कराव्या लागतात. या आजाराचा उपचार कसा केला जातो? पार्किन्सनसारख्या उपचार पद्धतीत नवनवीन शोध सतत लावले जात आहेत. त्यामुळे आता बरीच वेगवेगळी औषधे उपलब्ध आहेत. रुग्णांचे वय, त्याची लक्षणे, आजाराचे गांभीर्य आणि इतर आजार यावरून प्रत्येक रुग्णासाठी औषधे आणि त्यांचा डोस ठरवला जातो. सर्व रुग्णांना एकसारखी औषधे लागत नाहीत.

पार्किसनमध्ये मेंदूतील डोपामीनचे प्रमाण कमी होेते. त्यामुळे डोपामीनचे प्रमाण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वाढविण्यासाठी औषधे दिली जातात. खालील प्रकारची औषधे सध्या उपलब्ध आहेत. रुग्णामध्ये एकापेक्षा अधिक औषधे बर्‍याचदा सुरू असतात. औषधांचे डोस डॉक्टरांना विचारून जास्त कमी करावेत. औषधांच्या साईड इफेक्टस्बद्दल डॉक्टरांकडून माहिती करून घ्यावी. पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. सर्वसाधारणपणे ज्या रुग्णांचा आजार गंभीर आहे किंवा ज्या रुग्णांना औषधांमुळे जास्त साईड इफेक्टस् होतात अशांना शस्त्रक्रियेमुळे फायदा होऊ शकतो. यामुळे आजाराची लक्षणे कमी होण्यास व औषधांचे डोस कमी करण्यास मदत होते. शस्त्रक्रिया करून आजार पूर्णपणे बरा होत नाही.

व्यायाम काय करावेत?
रोज व्यायाम करून स्नायूंचा कडकपणा कमी होण्यास मदत होते. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. चालताना दोन पायांत अंतर जास्त ठेवा आणि पाय उचलून टाका. पटकन न वळता सावकाश वळा. बसण्यासाठी हात असलेली खुर्ची वापरा. उठताना सावकाश कडेपर्यंत येऊन पुढे वाका आणि हाताचा जोर देऊन उठा. शरीराच्या सर्व भागांची हालचाल होईल असे व्यायाम करून कडकपणा कमी होऊ शकतो. खाली यातील काही प्रकार दाखवले आहे.

काय खावे? काय खाऊ नये?
पार्किन्सनच्या रुग्णास अन्नातील सर्व घटक पदार्थ योग्य प्रमाणात मिळणे गरजेचे असते. बी व्हिटॅमिनमुळे औषधांचा गुणांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बी कॉम्प्लेक्सची व्हिटॅमिन्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. रुग्णांनी प्रोटीनयुक्त पदार्थ दिवसा कमी आणि शक्यतो रात्री खाल्ल्यास औषधांच्या पचनावर चांगला फायदा होतो. त्यामुळे मांसाहार, अंडी, कडधान्ये, दूध, केक, सूप, चॉकलेट, चीझ इ. पदार्थ रात्रीच्या जेवणात खावेत. चहा, कॉफी, फळे, भाज्या, तूप, पोळी, भात दिवसभरात खावे. कॉन्स्टीपेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि हिरव्या पालेभाज्या खाणे गरजेचे आहे.
डॉ. आनंद दिवाण

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!