पारोळा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास ग्रामस्थांनी ठोकले कुलुप ; खुर्चीला हार

0

पारोळा, |  प्रतिनिधी :  तालुक्यातील लोणीसीम येथील तलावाचे पाणी उपसा बंद करणे व पिण्यासाठी पाणी आरक्षित करणे बाबत लोणीसीम, लोणीसीम, लोणी खुर्द, धूळपिंप्री, नगाव, बाहुटे, पळासखेडे या भागातील ग्रामस्थ पारोळा येथील राष्ट्रीय महामर्गावर असलेल्या लघु पाटबंधारे विभागच्या कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी कोणी उपस्थित नसल्याने शेतकर्‍यांचा संताप झाला. उपस्थित शेतकर्‍यांनी विभागाच्या अधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालत कार्यालयास कुलुप ठोकले.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात विभागाच्या उदासीन अधिकार्‍यांची चौकशीची मागणी केली आहे.
लोणीखुर्द येथील सरपंच सुरेखा गोकुळ पाटील व उपसरपंच नागराज पाटील यांनी सांगितले, की आमच्या भागात असलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या तलावावर आजू बाजूच्या शेतकर्‍यांनी तब्बल २०० च्या वर इले.पंप लावले असून यामुळे जल पातळीवर परिणाम झाला आहे.

मागील वर्षी धरण हे ८० टक्के भरले होते. त्यात आज ङ्गक्त ३० टक्के साठा राहिला आहे. याबाबत विभागाचे अधिकारी राणे यांना वारंवार ङ्गोन करून आमच्या मागण्यांसाठी पाठपुरवा करण्याचा प्रयत्न करतो पण अधिकारी हे प्रतिसाद देत नाहीत.

यावेळी विविध गावांचे सरपंच, सदस्यांनी अधिकारी राणे यांचे विरोधात शेतकर्‍यांना इले. पंप लावण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करीत स्पष्ट केले, की परवानगी नसताना तलावाच्या बंधार्‍याजवळ विहिरी कशा खोदल्या गेल्यात? त्या विहिरीत आडवे बोर केले गेले, तरी विभागाने का चौकशी केली नाही, असा आरोप करीत मागील वर्षी या परिसारत अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला गेला होता.

अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा ती वेळ येत असून याबाबत अधिकार्‍यांची चौकशीची मागणी त्यांनी करून त्यांच्या कार्यालयात जावून खुर्चीला हार घालीत कार्यालयास टाळे ठोकले.

यावेळी लोणी खुर्द येथील सरपंच सुरेखा गोकुळ पाटील, नगराज पाटील, अनिता भिल, वासुदेव पाटील, सुनील यशवंत पाटील, श्रीराम देसले, अन्ना पाटील व अनेक सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*