पारोळा पालिकेचा शिलकी व करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

0

पारोळा, |  प्रतिनिधी :  कुठल्याही प्रकारची करवाढ पारोळा नसतांना १७ कोटी १० लाख ७५ हजार रुपयांचा पारोळा पालिकेच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला.  नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पालिकेच्या सभागृहात झाली. यात सन २०१७ – १८ या वर्षासाठी ३ लाख ६० हजारांचा शिलकी अर्थसंकल्प आहे. त्यात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. गत वर्षापेक्षा ४ कोटी २३ लाख ६८ हजारांचा वाढ असलेला हा अर्थसंकल्प आहे.

मुख्याधिकारी डॉ. सचिन माने लेखापाल एच. एम. पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

यात प्रामुख्याने खालील विशेष तरतुदींचा नगरपरिषद व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या सुधारीत कायद्यातील आजी माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करणे तसेच ३१ मार्च पर्यंत पारोळा रोडलगत बालाजी पार्क, शनिमंदिर, पुनगांव रस्त्यावर धरणगांव वंजारी, बहादरपुर रस्त्यावर नागरीक उघड्यावर शौचास बसतात. म्हणुन म्हणुन यावरील सर्व भागात ३०/३० युनिटचे शौचालय बांधण्याच्या कामास प्राधान्य देवुन त्यासाठी ५० लाखाचा निधीची तरतुद अर्थसंकल्पात आहे.

पाणी पुरवठा योजनेसाठी २ कोटी ५ लाख ५७ हजार रुपयांची तरतुद आहे. उत्पन्नाचा विचार केला तर १ कोटी ५० लाख ९ हजार रुपये अपेक्षीत आहे. परंतु उत्पन्नापेक्षा खर्च ५५.४८ लाख रुपयांनी दिसुन येतो हि तुट भरुन काढण्यासाठी पाणी पुरवठा दरात मागणी मध्ये १५ टक्के वाढ करणे गरजेचे आहे. असे अर्थसंकल्पात सुचीविण्यात आले आहे.

दिवाबत्ती वरील करा बाबत उत्पन्नात २९ लाख ८१ हजार रुपये अपेक्षीत आहे. परंतु खर्चात ३४.३३ लाख आहे. ४.५२ लाख तुट अर्थसंकल्पात आहे. ही तुट शॉपींग सेंटरचे उत्पन्न व अनुदान यातुन भरुन काढता येईल असे अर्थसंकल्पात दाखविण्यात आले आहे.

आरोग्य व सुखसोई सुविधा पासुन ८०. लाख १३ हजार उत्पन्न दाखविण्यात आले आहे. परंतु यात वेतन खर्च १ कोटी ३५ लाख ४२ हजार निवृत्ती वेतन ४८.लाख २० हजार इंधन खरेदी खर्च २ लाख ३० लाख साफ सफाई साहित्य खरेदी खर्च १.६५ लाख जंतुनाशके खरेदी खर्च ६ लाख १० हजार इसारा खर्च २ लाख ५० हजार साफ सफाई  खर्च २७ हजारांचा खर्च आहे. म्हणजे १ कोटी ४४ लाख ४४ हजारांची तुट यात येणार आहे.

यासाठी आरोग्य सेवाकर म्हणुन मालमत्ता कराच्या ०.५ टक्के सेवा शुल्क आकारणी करणेत यावी अशी तरतुद तुट भरुन काढण्यासाठी अर्थसंकल्पात सुचविण्यात आली आहे. अग्निशमन सेवा पासुन येणारे उत्पन्न ३१ लाख ५५ हजार तर खर्च ३४ लाख ७६ हजार दाखविण्यात आला आहे.

यात ही ३ लाख २१ हजारांची तुट दाखविण्यात आली ही तुट भरुन काढण्यासाठी दुकान संकुलाच्या उत्पन्नामधुन भागविण्यात येणार आहे. विकास कामेसाठी १० लाख १३ चा आयोगातुन १० लाख वैशिष्टपुर्ण कामासाठी १० कोटी रुपये दलित वस्ती सुधारणा योजना ८० लाख दलितेत्तर वस्तीसाठी १० लाख सुजन निर्मल अभियान अंतर्गत जनउर्जा व लेखापरिक्षण यासाठी १४ लाख अग्निसुरक्षा अभियानासाठी ९ लाख अनु जाती जमाती व नवबौध्दांसाठी घरकुल योजनांसाठी ८० लाख रोड फंडासाठी १ कोटी ७० लाख नागरीकांसाठी १५ लाख स्वच्छ भारत अभियानासाठी २ कोटी रुपये अशा विविध योजनांसाठी निधी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पात असामान्य प्रशासना वरील खर्च ३ कोटी २१ लाख ५० हजार ६७० रुपये सार्वजनिक सुरक्षिततेसाठी ४२ लाख ९१ हजार ५०० रुपये आरोग्य सुखसोयी साठी ४ कोटी १५ लाख २० हजार ८० रुपये शिक्षणासाठी १२ लाख ५० हजार ३२० रुपये असा खर्च अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.

गतकाळात शहरातील काही भागांना एलईडी बल्ब बसविण्याचे काम अपुर्ण राहुन गेले. त्यासाठी ४०० पथदिवे बसविण्याचे कामाची अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली. त्यासाठी मंजुरी घेण्यात आली शहरात अनेक रस्त्यांची झालेली  दुरावस्था त्या रस्त्यांचे नुतनी करण व रस्त्यांची दुरुस्ती या अर्थ संकल्पात सुचविण्यात आली त्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे.

शहराचा सर्वात जिल्ह्याचा पाणी प्रश्‍न यासाठी पाणी शुद्धी करणासाठी ब्लिचिंग व ऍलम साठी २५ लाख रुपयांची तरतुद यासाठी अर्थसंकल्पात करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष वर्षा सुधाकर पाटील यांचेसह नगरसेवक मुख्याधिकारी सचिन माने एच एम पाटील, अनिल घुले, कैलास पाटील, सुनिल कुलकर्णी, राजपुत आरडी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*