पारोळा तालुक्यातील पिंप्री येथील जमीन विक्रीप्रकरणी : ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0

जळगाव |  प्रतिनिधी :  पारोळा तालुक्यातील प्रिंपी येथील गावठाण शिवारातील शासकीय जमीन तत्कालीन ग्रामसेवकांने परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकाराची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दखल घेत त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली असल्याचे समजते.या प्रकरणाची चौकशी केली असून पारोळा बीडीओंना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान बीडीओंनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सीईओंनी दिला आहे.
पिंप्री येथील तत्कालीन ग्रामसेवक डी.के.पाटील यांनी त्यांच्या नोकरीच्या काळात कुठलीही परवानगी न घेता गावातील गावठाण शासकीय जमीनीची परस्पर विकी केली. दरम्यान ही बाब माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते गुलाब पाटील यांनी उघडकीस आणली. पाटील यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार देखील केली आहे.

या तक्रारीची दखल घेवून सीईओंनी पारोळा बीडीओ यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर ग्रामसेवक डी.के.पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक डी.के पाटील चौकशी केली असून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*