पारोळा तहसिल कार्यालयात तीव्र पाणी टंचाई

0

पारोळा (श. प्र) :  यापुर्वी तहसिलकार्यालय गावात असल्याने त्याठिकाणी कायम पाणी राहायचे मात्र कार्यालय कासोदा रस्त्यावरील नव्या इमारतीत गेल्यापासुन पिण्याचे व वापरासाठी लागणारे पाण्याची व्यवस्था नसल्याने कर्मचार्‍यास नागरीकांचे हाल होत आहेत.

नव्या इमारतीत गेट जवळ मोठी सिमेंटची पाण्याची टाकी बांधण्यात आली असुन त्यात टँकरने पाणी टाकले असता पाणी मागवुन छतावरील टाक्या भरुन वापरण्यास कामी येते. न. पा. ने पाईप लाईन टाकुन नळ जोडणी करण्याची मागणी केली आहे.

इमारतीतील जिन्यावरील फरश्या निघाल्या असुन अनेक दरवाजे तुटलेले असुन या नव्या इमारतीची डागडुजीसाठी बांधकाम खात्याला पत्र दिले असुनही दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात आले.

कासोदा रस्त्यावरील नवीन तहसिल कार्यालयात नळ कनेक्शन देण्यासाठी इस्टीमेट तयार असुन तवकरच नळ कनेक्शन जोडणी करुन तहसिल मधील पाणी टंचाई दुर करणार  –  करण पवार, नगराध्यक्ष
तहसिलची इमारत बांधकाम झाल्यापासुन ते आजपावेतो याठिकाणी पाणी नसल्याने नागरीकांसह कर्मचार्‍यांचे फारच हाल होतात. झाडांसाठी व वापरण्यासाठी खाजगी टँकरने पाणी मागवावे लागते  – श्रीमती वंदना खरमाळे तहसीलदार

LEAVE A REPLY

*