Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

पारावरच्या गप्पा : औंदा भावकीत आमचीच दिवाळी तोऱ्यात

Share

(गावाकड दिवाळीची लगबग…एका घरात भांडण चालू असल्याचा आवाज)

उजाबाई : (स्वतःशीच ) आम्हीच काम करायची आम्हीच त्रास सहन करायचा.. असं कूड असतंय का? पाच वरीस सहन केलं आता न्हाय ..पाच वर्षात साधी नीट दिवाळी साजरी करता आली न्हाय… का पोराला काय घेता आलं न्हाय. औंदा बघतेच …
वर्षांबाई : (बाहेर येत ) जाऊबाई , असं रुसून बोलू नका, बाहेर या बरं …

(तेवढ्यात उजाबाईचा पोरग रडत रडत येत )
आदू : आई, चलना, मला खाऊ दे…

उजाबाई : अरे थांब थोडं, देते… (जावेशी भांडत ) जाऊबाई, औंदा तुमचं कायबी कारण चालायचं न्हाय..मलाबी पोर सोर हाय… मला पण दिवाळी हाय..मागच्या दिवाळीला लई ऐकलं तुमचं.

वर्षाबाई : तुम्हाला सोडून कुठं जाणार हाय का मी, पण भाऊबंदकी व्यवस्थित राहिली तरच दिवाळी गोड होईल ना..
उजाबाई : तुमच्या या गोड बोलण्यालाच मी फसले ..पण आता न्हाई ..नुसतं वरून गोड बोलायचं ..पोटात एक अन ओठात एक .. बरं मी हाय म्हणून नांदतेय दुसरी असती तर कवाच घर सोडून गेली असती.

वर्षाबाई : आव , एवढ्या मोठ्या घरात भांड्याला भांड लागणारच, तुम्ही नका मनावर घेऊ… मामंजीला मी सांगते हवं तर
उजाबाई : तुम्हालाच बोलावं लागलं … कारण ते तुमचं जास्तीच ऐकत्यात..बारामतीचे काका अन धरणगावचे पाहुणेबी येणार हायीत मह्या लेकराची दिवाळी गोड करण्यासाठी, मग सांगू नका मला, सांगितलं न्हाय म्हणून…

वर्षाबाई : असं नका करू जाऊबाई… इतक्या घाईत निर्णय नका घेऊ .. आव सणासुदीचे दिवस हायीत असं वंगाळ बोलू नका… मी दिल्लीला जाऊन मामंजींना तुम्हाला हवं ते द्यायला सांगते पण भावकी तोडू नका. थोडी कळ काढा हवं तर आमच्या पोरांना दोन सुरसुऱ्या कमी देईल पण तुम्ही घरातच दिवाळी करा..

उजाबाई : माझं मन एवढबी कुजक न्हाय.. या तुम्ही ..तंवर मीबी भाऊबीज करून येते…

(वर्षांबाई तावातावाने घरांकडे जाते, उजाबाई तिच्याकड पाहत… ‘लय पुढं पुढं बोलत होती, आता आली कि न्हाय माझ्या तावडीत’)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!