‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन-5’ लीक करण्याची धमकी

0

जॉनी डेपचा ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन-5’ हा सिनेमा हॅक केल्याचा दावा हॅकर्सने केला आहे.

पैसे द्या अन्यथा सिनेमा ऑनलाईन लीक करु, अशी धमकी दिल्याची माहिती आहे.

पायरेट्स ऑफ कॅरेबियन सीरिजचा हा पाचवा सिनेमा आहे.

Pirates of the Caribbean: Dead Men Tell No Tales असं या सिनेमाचं नाव आहे.

सिनेमा 24 मे रोजी सुरुवातील इटलीमध्ये रिलीज केला जाणार आहे. सिनेमा खरोखर हॅक केला आहे का, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अमेरिकेतील प्रसिद्धी टीव्ही मालिका ऑरेंज इज द न्यू ब्लॅक हॅकर्सने ऑनलाईन लीक केली होती. त्यामुळेच हा सिनेमाही पैसे न दिल्यास लीक केला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे.

सिनेमा लीक होण्यापासून रोखण्यासाठी निर्मात्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे, ज्यासाठी निर्माते तयार नाहीत. त्यांनी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयशी संपर्क केल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

*