पाथरेचे शेतकरीही संपावर जाणार

0

पाथरेच्या विशेष ग्रामसभेत निर्धार; कर्जमाफीचाही ठराव

 

माहेगाव (वार्ताहर)- कर्जमाफी आणि शेतीच्या अन्य प्रश्‍नांसंदर्भात संपावर जाण्याचा निर्णय राहाता तालुक्यातील पुणतांबा व परिसरातील शेतकर्‍यांनी घेतला असतानाच, आता हे लोण राहुरी तालुक्यात आले आहे. केवळ कौंटुबिक गरजेपुरता शेतमाल पिकवून संपावर जाण्याचा निर्णय तालुक्यातील पाथरे खुर्दच्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच कर्जमाफीचा ठरावही करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिभाताई जाधव या होत्या.

 
केंद्र सरकार शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा 20 ते 40टक्के कमी आधारभूत किंमत जाहीर करीत असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. डाळी, गहू, कांदा, पामतेल सारखा शेतीमाल इतर देशातून अवास्तव दराने खरेदी करून देशांतर्गत शेतीमालाचे भाव पाडले जातात. सरकारचे हे धोरण शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे यांनी यावेळी केला. निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामा काढून मोदी सरकारने डॉ. स्वामीनाथनप्रमाणे हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण ते पाळले नसल्याचेही सांगितले.

 
याप्रसंगी उपसरपंच कांतीलाल जाधव, विजय जाधव, नारायण टेकाळे,चंद्रकांत पवार, नारायण जाधव, साहेबराव जाधव यांनी आपली मते मांडली. ग्रामसभेस शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जाधव, अशोक टेकाळे, दादासाहेब टेकाळे, राजेंद्र टेकाळे, सोसायटीचे अध्यक्ष भिकाभाऊ जाधव, उपाध्यक्ष अर्जून लोखंडे, संचालक भाऊसाहेब जाधव, एकनाथ जाधव, शिवाजी टेकाळे, रखमाजी जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र झरकर, पोलिस पाटील अनिल काळे, ग्रामसेवक बटुळे, कामगार तलाठी वायखिंडे, रणछोडदास जाधव, परशुराम जाधव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन परशुराम जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

*