पाणी टंचाईला वीज प्रवाहाच्या शॉट डाऊनची फोडणी देवू नका : आ. पिचड

0

अकोले (प्रतिनिधी) – एकीकडे पाणी टंचाई सुरु आहे. त्याला वीज शॉट डाऊनची फोडणी देवू नका, अशी तंबी आ. वैभवराव पिचड यांनी दिली.

 
अकोले तालुका खरीप हंगाम 2017-18 व सद्य पाणी टंचाई आढावा बैठक आ. वैभव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली के. बी. देशमुख सभाग्रुहात पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती सभापती कैलासराव वाकचौरे, नगराद्यक्ष के. डी. धुमाळ, पंचायत समिती सभापती रंजना मेंगाळ, उप सभापती मारुती मेंगाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गिरजाजी जाधव, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, गट विकास अधिकारी सुमीत पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तहसीलदार मनोज देशमुख आदी उपस्थित होते.

 
आ. पिचड म्हणाले की, सध्या वीज प्रवाह खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणी पुरवठा योजना त्यामुळे बंद पडत आहेत. वीज वितरण कंपनीने त्यात सुधारणा करावी. अन्यथा जनक्षोभ वाढेल. त्यावर वीज वितरण अधिकार्‍याने 2-3 दिवसात त्यात बदल होईल असे सांगितले.

 
तालुक्यात पाचनई, मन्याळे, बिताका, मुथाळणे या 4 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे असे गट विकास अधिकारी सुमीत पाटील यांनी सांगितले. तर चार गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. ते लगेचच मंजुरीला पाठवले जातील. तर तीन ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. त्यांचे रीतसर प्रस्ताव आलेले नाहीत.अशी माहिती त्यांनी दिली.
तालुका पंचायत समिती समिती कृषी अधिकारी भानुदास तिकांडे यांनी तालुक्यासाठी उपलब्ध केले जाणारे बी-बियाणे यांची माहिती दिली. खतांचे सद्य साठ्यांचे व नंतर आवश्यक मागणीचीही त्यांनी यावेळेस माहिती दिली.

 
तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी शेती, सम्रुद्ध शेतकरी याची माहिती देवून शेतीसाठी यांत्रिकी साधन सामुग्रीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 13 मे ही आहे. सर्व साधारण गटातील शेतकर्‍याला यासाठी 50 टक्के व आदिवासी शेतकर्‍याला 100 टक्के अनुदान दिले जाणार्‍या साधन सामुग्रीची माहिती दिली. उन्नत शेतीसाठीचे प्रशिक्षण 25 मे 7 जून याकाळात आयोजित केले गेले आहे.

 
आकस्मिक आपत्तीत पीक नुकसान झाल्यास 24 तासाच्या आत प्रशासनाला कळविले जावे. त्यावर लगेचच कारवाई होईल. त्याचा पंचनामा करून विमा कंपनी शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा करील असे कृषी अधिकारी हासे यांनी सांगितले. तसेच अनुदानावर होणार्‍या शेततळ्यांच्या धोरणात बदल झालेला आहे. 2013-14 नंतर वैयक्तीक शेततळे घेणार्‍या शेतकर्‍याला ऑनलाईन माहिती द्यावी लागणार आहे. त्यात अस्तरीकरण, कागद व इतर बाबींचा समावेश असेल, असे ते म्हणाले. सामूहिक ऊस रोपे निर्मिती व सामूहिक अवजारे खरेदी याचे धोरणही यावेळेस स्पष्ट केले गेले.

 

 

LEAVE A REPLY

*