पाणीवापर संस्था-पाटबंधारे खात्याकडून अन्याय

0

कोपरगाव (प्रतिनिधी) – सहकारी पाणीवापर संस्थेचे क्षेत्र पाचशे एकराचे असेल तर पाटबंधारे खात्याकडून अवघ्या शंभर एकरासच पाणी दिले जाते, उर्वरित चारशे एकर क्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवले जाते. तेव्हा या वंचित क्षेत्रातील लाभधारक शेतकर्‍यांना सात नंबरवर पाणी अर्ज भरू द्यावेत अशी मागणी अरविंद ससाणे यांनी केली आहे.

आ. स्नेहलता कोल्हे यांनी युती शासनाच्या शेती शिवार सभेचे आयोजन संवत्सर येथे शेतकर्‍यांच्या बांधावर करून शेतकर्‍यांसाठी शासनाने आजवर घेतलेल्या सर्व निर्णयाची माहिती दिली. त्यात ससाणे यांनी ही मागणी केली आहे. प्रारंभी भाजपाचे पांडुरंगशास्त्री शिंदे यांनी प्रास्तविकात केंद्र व राज्य शासनाने अडीच वर्षात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, संजीवनीचे संचालक फकिरराव बोरनारे, बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे, प्रभाकर ससाणे, संभाजी बोरनारे, बाळासाहेब शेटे, माळी महासंघाचे मुकूंद काळे, भरत ढमढेरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब बारहाते, संपतराव भारूड आदी उपस्थित होते.

भाजपाचे उपाध्यक्ष रामभाऊ कासार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अरविंद ससाणे म्हणाले गोदावरी कालव्यावर सर्वात जुनी संवत्सर पाणी वापर संस्था आहे. मात्र दर आवर्तनात आम्हास नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. खरीप हंगामात सहकारी पाणी वापर संस्थेला अगर शेतकर्‍याला सात नंबरचा अर्ज सुध्दा भरू दिला जात नाही.

दारणा गंगापूर धरणांवरील वाढते बिगर सिंचन पाण्याचे आरक्षण सर्व धरणांवर समप्रमाणात टाकल्याबद्दल आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला. शेतकर्‍यांच्या शेतीला पाण्याची कमतरता आहे ते वाढविण्यासाठी आमदार कोल्हे यांनी आपले सर्व कसब पणाला लावावे असे ते म्हणाले.

माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे आमच्या हक्काच्या पाण्यांसाठी याही वयात संघर्ष करतात याची जाण सर्वांनी ठेवावी.
-अरविंद ससाणे

LEAVE A REPLY

*