पाणीबाणी उंबरठ्यावर

0

मुळा, भंडारदरा, निळवंडेने गाठला तळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असणार्‍या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांनी तळ गाठला आहे. नगर शहराला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊल लांबल्यास पाणीबाणीचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे आहे ते पाणी जपून वापरावे लागणार आहे.

मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू असल्याने धरणात उपयुक्त पाणीसाठा 2 हजार 499 दशलक्ष घनफुटापर्यंत खालावला आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणाची स्थिती वेगळी नाही. पाऊस लांबल्यास परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
नगर शहरासह राहुरी, नेवासे तालुक्यांना पाणी पुरवठा करणार्‍या मुळा धरणामध्ये सध्या अवघा साडेबारा टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून शेतीसाठी विसर्ग सुरू असल्याने धरणातील उपयुक्त पाणी झपाट्याने कमी होत आहे. परंतु पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेवण्यात आले असल्याने शहरासह परिसराला पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
2 वर्षे जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळे जिल्ह्यासह नगर शहराच्या आसपास असणार्‍या उपनगरांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले होते. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात मात्र मुळा धरणामध्ये मुबलक पाणी साठा होता. परंतु सध्या उजव्या व डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनामुळे हा साठा कमी होत आहे.
पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये 29 एप्रिलपर्यंत 10 हजार 326 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यापैकी 5 हजार 826 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा होता. परंतु या धरणाच्या उजव्या कालव्यातून 1 हजार 652 व डाव्या कालव्यातून 300 क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले असल्याने 17 दिवसांमध्ये धरणातील उपयुक्त पाणीसाठा जवळपास 5 टक्क्यांनी कमी झाला आहे. या धरणामध्ये 17 मेपर्यंत एकूण 5 हजार 190 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून त्यापैकी दोन हजार 690 उपयुक्त पाणीसाठा आहे.
भंडारदरा धरणात सध्या 2 हजार 933 326 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा 2 हजार 633 326 दशलक्ष घनफूट आहे. निळवंडे धरणात 1 हजार 890 326 दशलक्ष घनफूट पाणीसापाणी साठा असून उपयुक्त पाणीसाठा 1 हजार 634 326 दशलक्ष घनफूट आहे.

काही भागात पाच दिवसांनी पाणी
शहराला उन्हाळ्यात सर्वत्र मोठया प्रमाणात पाण्याची टंचाई भासत आहे.महानगरपालिकेच्या वतीने शहराला मागील काही वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील काही भागात 3 ते 5 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो. काही ठिकाणी मनपाच्या 13 टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. शहरात काही भागात फेज टू चे काम अपर्ण आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला दररोज पाणी पुरवठा करणे शक्य असल्याचे मनपा पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

या भागात दिवसाआड पाणी
शहरातील झेंडीगेट, सर्जेपुरा, कापडबाजार, माळीवाडा, चितळे रोड, सिव्हील हाडको,पाईपलाईन रोड, सावेडी, बोल्हेगांव, यासह शहरातील अन्य भागात मागील दीड ते दोन वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तर शहराच्या काही भागात अनेक वर्षांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. असे असतांना मनपाकडून नगरकरांना पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी आकारणी होत आहे.

फेज टूनंतर दररोज पाणी शक्य
शहराला दररोज 100 एम.एल.बी पाण्याची आवश्यकता आहेे. सध्या 58 ते 60 एम.एल.बी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहरास पाण्याची मागणी पाहता उपलब्ध साठाच्या प्रमाणात विविध भागात पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात मागील काही वर्षापासून फेज टू योजनेचे काम अपूर्ण स्थितीत आहे. हे काम पूर्ण झाल्यावरच शहराला दररोज पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

*