Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पाडव्याचा सण महत्वाचा असला तरी संकटाचे गांभीर्य ठेवा – आ. विखे

Share

शिर्डी (प्रतिनिधी) – गुढी पाडव्याचा सण महत्वाचा असला तरी समोर उभे असलेले संकटही लक्षात घ्या, विनाकारण घराच्या बाहेर पडून प्रशासन आपल्यासाठीच घेत असलेल्या महत्वपूर्ण निर्णयात अडथळे आणून कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
आ. विखे पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांसाठीच गुढीपाडव्याचा सण या मराठी नववर्षांचे स्वागत उत्साहाने करण्याची परंपरा आपली असली तरी, कोरोनासारख्या जागतिक आपत्तीचे संकट पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांच्या समोर उभे राहिले असल्याने याचे गांभीर्यही असू द्या, असे त्यांनी सूचित केले.

Leave a Comment

error: Content is protected !!