Type to search

जळगाव

पाठलाग करुन पकडलेली ती मोटारसायकल चोरीचीच !

Share

जळगाव । जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रशांत पाठक यांनी पाठलाग करून पकडलेली ती मोटारसायकल चोरीचीच असल्याचे निष्पन्न झाले असून ती मोटारसायकल पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मे महिन्यात चोरीला गेल्याचे तपासात समोर आले आहे.

पाचोरा तालुक्यातील मोहाडी परिसरातून एमएच 19 सीक्यू 1921 ही मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी दि.16 रोजी गस्तीवर असतांना त्यांना कर्मचारी प्रशांत पाठक यांनी पाठलाग करून दोन विद्यार्थ्यांना पकडले होते.

त्यांच्याकडे मिळून आलेल्या संशयित मोटारसायकलीवर एमएच 15 जी 2 या क्रमांक होता. जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे सपोनि संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रशांत पाठक यांनी मोटारसायकलीच्या इंजिन व चेसीस नंबरवरुन गाडीची माहिती मागविल्यानंतर मुळ मालकाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर ही गाडी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे तपासात समोर आल्यानंतर गाडी चोरणार्‍याचा शोध येणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!