पाच लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

0

20 मे पासून जिल्ह्यात होणार पुरवठा

अहमदनगर (प्रतिनिधी) – सर्व शिक्षा अभियानांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील पाच लाख सात हजार 202 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असून त्यासाठी नऊ कोटी 62 लाख 72 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

यंदा इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात बदल झालेला आहे. मात्र, सदर पुस्तकांची छपाई पूर्णत्वाकडे असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला. वेळेत पुस्तके देण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी प्रमाणे शैक्षणिक वर्षाच्या मध्यंतरानंतर पुस्तके मिळणार का? की शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार याकडे मात्र, विद्यार्थ्यासह पालकांचे लक्ष लागले आहे.

राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाकडून 20 मे पासुन नगर जिल्ह्यात पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे तालुकास्तरावर पुस्तके उतरविण्यात येणार असून त्यानंतर केंद्र शाळानिहाय पुस्तके पोहोच करण्यात येणार असल्याचे समजते.

पहिली ते पाचवी विद्यार्थी संख्या
इयत्ता पहिली पाचवीची एकूण विद्यार्थी संख्या दोन लाख 96 हजार 893 इतकी आहे. तालुकानिहाय संख्या अशी- नगर-20321, संगमनेर-34814, नेवासा-27991, पाथर्डी-19093, पारनेर-18489, राहुरी-24569, कर्जत-16942, जामखेड-11896, कोपरगाव-21267, श्रीरामपूर-18843, अकोले-21169, श्रीगोंदा-21653, शेवगाव-19134, राहाता-20712 आदी.

सहावी ते आठवी विद्यार्थी संख्या
जिल्ह्यात इयत्ता 6 वी ते 8 वीची एकूण विद्यार्थी संख्या एक लाख 96 हजार 147 इतकी आहे. तालुकानिहाय अशी : नगर-12852, संगमनेर-23290, नेवासा-18507, पाथर्डी-13022, पारनेर-12020, राहुरी-14531, कर्जत-10833, जामखेड-7610, कोपरगाव-14868, श्रीरामपूर-12637, अकोले-14337, श्रीगोंदा-13672, शेवगाव-13338, राहाता-14630 आदी.

LEAVE A REPLY

*