पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने जळगावकरांचा संताप

0
जळगाव  / वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने वाघुर व उमाळा जलशुद्धीकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. महावितरण व मनपा प्रशासनाने दुरुस्ती केल्यानंतर काल विद्युत पुरवठा सुरळीत झाला.
त्यानंतर शहरात काही भागांमध्ये पाणीपुरवठा सुरु होताच पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला.
गेल्या पाच दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने जळगावकरांकडून संताप व्यक्त होत आहे.

वाघुर व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राजवळ वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे विद्युत तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

महावितरण व मनपा प्रशासनाने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु वारंवार बिघाड येत असल्याने शहरातील पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झाला आहे.

काल रात्री 11 वाजेच्या सुमारास पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे शहरातील जलकुंभ न भरल्याने पाणीपुरवठा बंद झाला.

पाण्यासाठी भटकंती
शहरात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने जळगावकर पाण्यासाठी भटकंती करु लागले आहे. जिथे पाणी उपलब्ध होईल. त्याठिकाणीहून आणण्याचा नागरिक प्रयत्न करु लागले आहेत. तसेच स्थानिक नगरसेवकांकडून टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पाणीपुरवठा आज होणार
विद्युतपुरवठा सुरळीत झाल्याबरोबर सकाळी 9.30 वाजता शहरातील जलकुंभ भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काल ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात आज पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पा.पु.अभियंता डी.एस.खडके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*