पाचोरा येथे उघड्यावर शौचाला बसणार्‍या आठ जणांवर कारवाई

0

पाचोरा |  प्रतिनिधी :  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातिल विविध भागात उघड्यावर शौचास बसणार्‍या आठ जणांवर आज कारवाही करण्यात आली. यावेळी कारवाही झालेल्याना पोलिस स्टेशनला आणले असता नातेवाईकांनी नगर पालिका स्वच्छतेबाबतच्या सेवा व सुविधा पुरवण्यास असमर्थ असुन आगोदर सेवा सुविधा द्या नंतर कारवाही करा असा तक्रारीचा सुर काढला.

नगर पालिका गुडमॉर्निंग पथकाने आणलेल्या आठ जणांना पकडुन  पोलिसांच्या स्वाधिन करतांना दोन्ही प्रशासनात समन्वयाचा परीणाम दिसुन आल्याने तिन जण पळुन जाण्यात यशस्वी झाल्याने या योजनेचा ङ्गज्जा उडाला आहे.
पाचोरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियानाचे कार्य करू लागले आहे.

या अभियानातिल अंतिम टप्पा म्हणजे उघड्यावर शौचास बसणार्‍यावर गुन्हे दाखल करणे यावर भर दिला जात आहे. आजवर सुमारे ३० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत .

आज सकाळी आरोग्य निरीक्षक धनराज पाटिल यांच्या नेतृत्वाखालिल उल्हास पाटिल ,अणिल मेघराज पाटिल , राजेंद्र पाटिल , भिकन गायकवाड, सुनिल चव्हाण , विनोद सोनवणे , देविदास देहडे , अरूण गायकवाड , निळकंठ ब्राम्हणे यांच्या पथकाने कृष्णापुरी भागातिल शिवराम पाटिल ,अणिल मराठे, भागवत जाधव , रामदास पाटिल हनुमान नगर , ईश्वर अहिरे श्रीराम नगर , दिलिप गायकवाड बाहेरपुरा , गुलाब उस्मानअली कुर्बान नगर व गोकुळ पाटिल देशमुखवाडी यांना पकडले.

त्यांना पोचोरा पोलिसात आणले गेले त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू असतांना नागरीकांनी नगर पालिका पथकाच्या कर्मचार्यांवर तोंडसुख घेतले.शेवटी पाच जणांना पोलिसांच्या ताब्यात देउन कारवाहीची पुर्तता करण्यात आली. नगर पालिकेच्या सोई सुविधांबाबत नागरीकांमधे असलेली नाराजी या धरपकड मोहीमेमुळे समोर आली आहे.

प्रभागातिल नगरसेवक , समाजसेवक यांना सक्रीय सहभाग या उपक्रमात करुन घेणे गरजेचे आहे.
या प्रकरणातिल पोलिसांच्या ताब्यात असलेले पाचही जणांना आज पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रत्येकी १२०० रूपये दंड करण्यात आला.

LEAVE A REPLY

*