पाचोरा पं. स. सभापतींनी केली अभियंत्यांची झाडाझडती

0

पाचोरा |  श.प्र. :  पाचोरा पंचायत समितीत तब्बल पंधरा वर्षानंतर घडलेल्या संत्तातरातुन भारतीय जनता पक्षाचा झेंडा पंचायत समितीवर फडकला आहे. दि. १६ मार्च रोजी नवनियुक्त सभापती सुभाष (मुंडे) पाटील यांनी सभापती पदाचा पदभार स्विकारल्या नंतर सभापतींनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांची झाडाझडती घेत मागील काळातील कामकाजासंदर्भात नाराजी व्यक्त करुन येणार्‍या काळात कोणत्याही तक्रारी येवू न देता जनतेची व शासनाची कामे पारदर्शकरित्या करण्याबाबत सुनावल्याचे खात्रीशिर वृत्त असुन याबाबत सभापतींनी दै.देशदूतला दिलेल्या माहीतीत सदर प्रकाराचा हुजोरा दिला.

पाचोरा पंचायत समितीत नुकत्याच झालेल्या जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीतुन सत्ता परिवर्तन झाले आहे. भाजपाने कॉंग्रेसच्या एकमेव सदस्याच्या सहकार्याने पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविला

तर २५ वर्षांच्या मोठ्या कालखंडात राजकिय वनवासात असणार्‍या कॉंग्रेस पक्षाला उपसभापती पद मिळाल्याने कॉंग्रेसलाही पाचोरा तालुक्यात भाजपाच्या अच्छे दिन सोबत राजकिय सक्रीयतेची संधी मिळाल्याने कॉंग्रेसही अच्छे दिनची चव चाखणार आहे.

सभापती निवड व नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त सभापती सुभाष (मुंढे) पाटील यांनी दि. १६ मार्च रोजी पदभार स्विकारला. सभापतींनी पदभार घेतल्यानंतर तातडीने सार्वजनिक बांधकाम व पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांची व कर्मचार्‍यांची बैठक घेवून या विभागांतर्गत शासकीय निधीतून तसेच आमदार व खासदार निधीतून होणारी घरकुले, रोजगार हमी, रस्ते व विविध योजनांतर्गत बांधकाम विभागाकडून येणार्‍या कामांचा तपशिल सह माहिती घेतली. तसेच पाणी पुरवठा विभागांतर्गत शासनाच्या पेयजल योजनांच्या कामांची माहीती जाणुन घेतली.

पहिल्याच दिवशी सभापती सुभाष पाटलांनी अचानक घेतलेल्या बैठकीमुळे ह्या दोन्ही विभागाच्या अभियंत्यांची माहीती देतांना तारांबळ उडाल्याचे समजते. तर सभातींनी यापुढे जनहितांच्या कामात दिरंगाइ व तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या कोणत्याही अधिकार्‍याची व अभियंते कर्मचार्‍यांची गय केली जाणार नसून पंचायतीच्या सर्वच विभागांच्या कामकाजासंदर्भात खुल्लासेवार बैठका घेण्यात येतील

तसेच मागील काळात जनतेने केलेल्या तक्रारींना लालबस्त्यात गुंडाळून वेळ मारुन नेणार्‍यांच्या चौकश्या केल्या जातील अशी माहीती  दै. देशदूतला दिली.

LEAVE A REPLY

*