पाक-इराण सीमेवर दहशतवादी हल्ला; 2 इराणी नागरिकांचा मृत्यू

0
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी इराण सीमेत घुसखोरी करत असताना इराणच्या दिशेने गोळीबार केला.
यात 2 नागरिकांचा मृत्यू झाला अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सने रविवारी दिली आहे.
इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सच्या ग्राउंड फोर्सचे कमांडर मोहम्मद पकपूर यांनी दहशतवाद्यांना कुठल्याही ठिकाणातून शोधून ठार मारणार असे ठणकावले आहे.
इराणची वृत्तसंस्था सबाहन्यूजच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, पाकच्या घुसखोर दहशतवादी टोळीने सिस्तान-बलुचिस्तान सीमेजवळ घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही इराणी कामगार त्यांच्या समोर आले असता त्यांनी या कामगारांवर बेछूट गोळीबार केला.
दहशतवादी हल्ल्यामध्ये 2 इराणी कामगारांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*