पाकिस्तानच्या क्वेटा शहरात बॉम्बस्फोट; ८ ठार

0

पाकिस्तानचे क्वेटा शहर आज बॉम्बस्फोटामुळे हादरले.

बलुचिस्तान येथे हा स्फोट झाला.

बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे झालेल्या या बॉम्बस्फोटात किमान ८ जण ठार  तर १३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा स्फोट पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाजवळ झाला.

हा स्फोट झाल्यानंतर लगेच आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. पाकमधील माध्यमांनी किमान ८ जण ठार झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

*