पाकला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम – ना.डॉ.भामरे

0
जळगाव  / काश्मिरात युध्दजन्य परीस्थीती नसल्याचा दावा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी आज पत्रकार परीषदेत केला.
दरम्यान पाकला सडेतोड उत्तर देण्यात भारत सक्षम असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘सबका साथ सबका विकास’ या संमेलनाला आजपासुन सुरवात झाली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत पाल येथे मेळावा पार पडला.

त्यानंतर भाजपा कार्यालयात आयोजीत पत्रकार परीषदेत माहिती देतांना ना. डॉ. भामरे म्हणाले की, सन 2014 पुर्वी युपीए सरकारकडुन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला नाही.

गुजरातचा सर्वांगिण विकास घडविणारे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व 2014 मध्ये लाभले. त्यानंतर तीन वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.

देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली. या 70 वर्षात मात्र शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला नाही. युपीए सरकारने केवळ लुटायचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.

मेक इन इंडीया, स्टॅण्ड अप इंडीया, उज्ज्वला भारत गॅस योजना, जनधन योजना, आम आदमी विमा योजना, डीबीटी, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक योजना आता गरजूपर्यंत पोहचण्यात भाजपा सरकारला यश येत असल्याचा दावा ना. डॉ. भामरे यांनी केला.

काश्मिरातील चित्र मिडीयाने रंगविले
काश्मिरात युध्दजन्य परीस्थीती नसल्याचा दावा ना. डॉ. सुभाष भामरे यांनी केला. तसेच काश्मिरातील हिंसाचाराचे वारंवार प्रक्षेपण करून काश्मिरात युध्दजन्य परीस्थीती असल्याचे चित्र मिडीयानेच रंगविल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्य सरकार कर्जमाफी देणारच
राज्यातील भाजपा सरकार शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. कर्जमाफीचा फायदा खर्‍या शेतकर्‍याला व्हावा या उद्देशानेच मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्याचा कालावधी दिला आहे. या तीन महिन्यात कर्जमाफीचे स्ट्रक्चर तयार करून ती जाहीर केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

कुलभुषण जाधवांना फाशी होऊ देणार नाही
कुलभुषण जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने सर्व पुरावे दिले आहेत. पाकीस्तानवर डिप्लोमेटीक दबाव असल्यानेच फाशीला स्थगिती मिळाली असुन जाधव यांना फाशी होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले.

पाच वर्षात सगळे प्रकल्प पुर्ण होणार
शेतकर्‍याला पाणी, वीज आणि हमीभाव या तीन गोष्टींची गरज आहे. त्याला पाणी मिळण्यासाठी पुढील पाच वर्षात सगळे प्रकल्प भाजपा सरकार पुर्ण करणार असल्याचेही ना. डॉ. भामरे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परीषदेस जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आ. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, अ‍ॅड. किशोर काळकर, विशाल त्रिपाठी, गितांजली ठाकरे, अ‍ॅड. जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*