पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; सात गावांना केले लक्ष्य

0

शनिवारी रात्री जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

पाकने सात गावांना लक्ष्य केले. यानंतर भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानने लहान व स्वयंचलित शस्त्रे, तसेच ८२ मिमी व १२० मिमीच्या तोफांचा वापर केला.

यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी सीमा रेषेवरील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची १० मे पासूनची ही चौथी घटना असून त्यात आतापर्यंत तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*