पाऊस क्षणभर; वीज गायब रात्रभर !

0
नंदुरबार / पाऊस क्षण भर पण वीज गायब रात्रभर… अशी सध्या नंदुरबार जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीची अवस्था असून सातत्याने वीजपुरवठा खंडीत करून रात्री उशिरापर्यंत नागरीकांना उकाडयाने हैराण व्हावे लागत आहे.
याबाबत वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर देखील प्रतिसाद मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरीकांची चांगलीच पंचायत होत आहे.
गेल्या सात ते आठ दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण व वेगवान वारे वहात असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी देखील सरी देखील कोसळतात.
त्याचप्रमाणे काही ठिकाणी वीजा देखील चमकत असतात. परंतु सुरूवात होताच वीज वितरण कंपनी पूर्व दक्षता म्हणून सर्व विद्युत वाहिन्यांवरील वीज पुरवठा बंद करते.
पावसाचा किंवा वार्‍याच्या जोर ओसल्यानंतर पाच ते दहा मिनीटात वीजपुरवठा सुरळीत होणे अपेक्षीत असते.
परंतु संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात सध्या थोडासा पाऊस पडल्यानंतरही रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही व त्याचा सर्व त्रास सर्वसामान्य नागरीकांना सोसावा लागतो.

आपल्या भागात काही दोष निर्माण झाला असेल तर वीज कर्मचार्‍यांना बोलवण्यासाठी वीज वितरण कंपनीने दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न ग्राहक करीत असतात.

परंतु कित्येकदा फोनचा रिसीव्हवर बाजूला ठेवला जातो आणि त्यामुळे कर्मचार्‍यांशी संपर्क होवू शकत नाही. त्या त्या भागातील कनिष्ठ व वरिष्ठ अभियंत्यांना फोन लावल्यास त्यांच्याकडून अरेरावीची उत्तरे दिली जातात.

कित्येक भागात वीज पुरवठा कमी दाबाने सुरू असतो. तर काही भागात अचानक वीजेचा दाब वाढून विद्युत उपकरण निकामी होण्याचे देखील घटना घडतात.

यासर्व प्रकाराने वीज ग्राहक वैतागले असून वीज वितरण कंपनीच्या या मनमानीला कंटाळली आहे. वीज बिलासंदर्भात देखील अनियमतीतता दिसून येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो.

वेळेवर रिडींग न करणे, रिडींग न करताच वीज बिल पाठविणे, वीज बिल दिलेल्या मुदतीत न देणे यामुळे ग्राहकांना दंड सोसावा लागतो.

या सर्व कारभारा विरोधात जनतेममध्ये तीव्र असंतोष असून वीज वितरण कंपनीने आपला कारभार त्वरीत सुधारावा अशी मागणी ठिकठिकाणी होत आहे.

नंदुरबार शहरात दोन विभाग असून या दोन्ही विभागाबाबत ग्राहकांच्या असंख्य तक्रारी आहेत.

शहरातील रेल्वे पट्टयापलिकडील पटेलवाडी, गिरीविहार कॉलनी, म्हाडा कॉलनी, हुडको कॉलनी, अमर कॉलनी, नळवे रोड, मंगळ बाजार, देसाईपूरा, महाराष्ट्र व्यायाम शाळा या भागात वीज गायब होण्याची नित्याचीच समस्या आहे.

एकाच डिपीवर अधिक लोड दिला जात असल्याने समस्या निर्माण होतात. अनेक ठिकाणी विद्यफत रोेहित्र उघडयावर आहे.

या सर्वच गोष्टींची दखल वरिष्ठ अभियंता श्री.पाटील यांनी घेणे अपेक्षीत आहे. परंतु त्यांच्याकडूनच अनेकदा उडवा उडवीचे उत्तरे दिली जात असल्याची नागरीकांची तक्रार आहे.

याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*